‘आई माझी काळू बाई’ मालिकेतील आशालता वाबगावकर कोरोना पॉझिटिव्ह, प्रकृती चिंताजनक ; मालिकेत काम करणारे २७ जण बाधित

सोनी मराठीवर (Sony Marathi)प्रसारित होणाऱ्या ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेतील ( Aai Mazi Kalu Bai Marathi Serial) तब्बल २७ कलाकारांना कोरोनाचा (Corona) विळखा बसला आहे. या मालिकेतील काम करणाऱ्यांपैकी ज्येष्ठ कलाकार आशालता वाबगावकर (Ashalata Wabgaonkar)यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना खाजगी रुग्णालयात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.

सातारा येथील फलटण तालुक्यात गेल्या महिनाभरापासून ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेचं शुटिंग सुरु होते. शुंटिंग दरम्यान आशालता वाबगावकर यांच्यासह २७ कलाकरांना कोरोनाची लागण झाली.आशालता यांना १६ सप्टेंबर रोजी वाई येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. ऑक्सिजन लेव्हल कमी जास्त होत असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी मुंबईहून गाण्याचं शुटिंग करण्यासाठी आलेल्या २० ते २२ जणांच्या ग्रुपमुळे ही घटना घडली आहे. मात्र या सगळ्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती.‘माझी आई काळूबाई’ मालिकेत काळूबाईची भूमिका अलका कुबल यांनी साकारली आहे. अलका कुबल यादेखील सेटवर होत्या. मात्र त्यांच्या प्रकृतीबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.