lijjat papad

लगान, स्वदेस, जोधा अकबर असे नावाजलेले चित्रपट देणारे दिग्दर्शक म्हणजे आशुतोष गोवारीकर. बॉलिवूडमधील आघाडीच्या प्रथितयश दिग्दर्शकांमध्ये स्थान मिळवणारे आशुतोष लवकरच एक नवा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यांचा हा आगामी चित्रपट लिज्जत पापड या प्रसिद्ध ब्रॅण्डच्या यशोगाथेवर आधारित आहे. विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रीची वर्णी लागल्याचे सांगण्यात येत आहे.

kiyara advani

आशुतोष गोवारीकर कायमच त्यांच्या चित्रपटांच्या माध्यमातून एक नवा विषय हाताळण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे लवकरच त्यांचा ‘कर्रम कुर्रम’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून ते महिला सबलीकरण आणि सशक्तीकरणाचा संदेश देण्याचा प्रयत्न करणार आहेत. या चित्रपटात अभिनेत्री कियारा आडवाणी मुख्य भूमिकेत झळकणार असल्याचे सांगण्यात येत आहे. लिज्जत पापड या उद्योगसमूहाची सुरुवात एका सामान्य गृहिणीने केली आणि पाहता पाहता तिच्या या व्यवसायाचा वटवृक्ष झाला. केवळ सहा गृहिणींच्या मदतीने हा व्यवसाय सुरू करण्यात आला होता. त्यामुळेच याविषयावर आधारित चित्रपट करण्याचा निर्णय आशुतोष गोवारीकर यांनी घेतला आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन ग्लेन बरेटो आणि अंकुश मोहला करणार असून सुनिता गोवारीकर या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. दरम्यान, ‘कर्रम कुर्रम’ या चित्रपटाची कथा पूर्ण झाली असून लवकरच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. सध्या कियारा ‘जुग जुग जियो’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. मात्र, हे चित्रीकरण सुरू करण्यापूर्वी तिने ‘कर्रम कुर्रम’ हा आगामी चित्रपट साईन केला आहे. तसेच तिचा आगामी ‘इंदू की जवानी’ हा चित्रपटदेखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.