विशालसोबत लवचा ‘कुत्ते’, पोस्टरने चित्रपटाबाबत उत्सुकता वाढली!

आसमान आणि विशाल भारद्वाजद्वारे लिखित, 'कुत्ते' एक सेपर-थ्रिलर असून, सध्या प्री-प्रोडक्शन स्टेजमध्ये आहे. साधारण २०२१च्या अखेरीस या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करण्याची योजना आखण्यात आली आहे.

    लव फिल्म्स आणि विशाल भारद्वाज फिल्म्स टी-सीरीजची प्रस्तुती असलेल्या ‘कुत्ते’च्या निर्मितीसाठी एकत्र येत असल्याची घोषणा आज केली. या चित्रपटाचं दिग्दर्शन आसमान भारद्वाज करत असून, त्यांचा हा पहिला चित्रपट आहे. चित्रपटाची झलक सादर करण्याच्या उद्देशानं निर्मात्यांनी मोशन-पोस्टरचं अनावरण केलं आहे. या चित्रपटात अर्जुन कपूर, कोंकणा सेन शर्मा, नसीरुद्दीन शाह, कुमुद मिश्रा, राधिका मदान, शार्दुल भारद्वाज आणि तब्बू हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

    आसमान आणि विशाल भारद्वाजद्वारे लिखित, ‘कुत्ते’ एक सेपर-थ्रिलर असून, सध्या प्री-प्रोडक्शन स्टेजमध्ये आहे. साधारण २०२१च्या अखेरीस या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करण्याची योजना आखण्यात आली आहे. आसमाननं स्कूल ऑफ विजुअल आर्ट्स, एनवाईसीमधून आपलं फिल्म मेकिंग पदवीचं शिक्षण पूर्ण केलं असून, वडिल विशाल भारद्वाज यांना ‘७ खून माफ’, ‘मटरु की बिजली का मंन्डोला’ आणि ‘पटाखा’ यांमध्ये असिस्ट केलं आहे. ‘कुत्ते’बाबत विशाल म्हणाले की, ‘कुत्ते’ हा चित्रपट माझ्यासाठी विशेष आहे. कारण आसमान आणि मी दिग्दर्शक-निर्माता म्हणून पहिल्यांदाच एकत्र येत आहोत. त्याचं काम पाहायला मी उत्सुक आहे.