‘नागडे राजकारणी…नागडं सरकार…’ अभिनेता अस्ताद काळेची संतापजनक पोस्ट व्हायरल!

आस्तादची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. अनेकांनी त्यावर कमेंट केल्या आहेत. काहींनी  ‘हे बरोबर आहे’ असे म्हणत पाठिंबा दिला आहे. तर काहींनी तू देशाला नागडा म्हणणारा तू कोण असा सवालही उपस्थित केला आहे.

    कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सगळ्यांनाच मोठा फटका बसला आहे. लसींसोबतच ऑक्सिजन, व्हेंटिलेटर अशा अनेक सुविधांचा अभाव निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान मराठमोळा अभिनेता आस्ताद काळेने देखील सरकार आणि राजकारण्यांवार निशाणा साधला आहे. त्याने केलेली पोस्ट सध्या चर्चेत आहे.

    अस्ताद आपल्या पोस्टमध्ये लिहीतो, प्रश्न विचारायचे आहेत…स्वत्व जपायचं आहे….कदाचित जीव गमवावा लागू शकतो…कारण..श्शु!!! कुठे काही बोलायचं नाही….अरे हाड…..आम्ही प्रश्न विचारणार….सत्तेच्या आणि सत्तेतल्या प्रत्येकाला….उत्तरं न देता आम्हाला गप्प करू बघाल तर तुम्ही किती नागडे आहात तेच दिसणार……नागडे राजकारणी…नागडं सरकार…नागडा देश….निरोप घेतो….