malvi malhotra

मुंबई: अभिनेत्री मालवी मल्होत्रा (malvi malhotra) वर आज प्राणघातक हल्ला(attack on malvi malhotra) करण्यात आला. मुंबईत तिच्यावर झालेल्या या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.योगेश असे हल्लेखोराचे नाव आहे. तो निर्माता असल्याचे त्याने म्हटले आहे.

मुंबई: अभिनेत्री मालवी मल्होत्रा (malvi malhotra) वर आज प्राणघातक हल्ला(attack on malvi malhotra) करण्यात आला. मुंबईत तिच्यावर झालेल्या या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. योगेश असे हल्लेखोराचे नाव आहे. तो निर्माता असल्याचे त्याने म्हटले होते.

योगेशने मालवीवर चाकूने चार वार केले. तिची प्रकृती आता स्थिर आहे. अभिनेत्रीने केलेल्या तक्रारीनुसार, आरोपी योगेश महिपाल सिंह याच्यासोबत फेसबुकद्वारे ओळख झाली होती. कामानिमित्त त्याला फक्त एकदाच भेटली होती. सोमवारी ती घराबाहेर पडली. त्यावेळी हल्लेखोर कार घेऊन बाहेर थांबला होता. त्याने मालवीला भर रस्त्यात अडवायचा प्रयत्न केला. त्यावेळी तिने विरोध केला. त्यानंतर त्याने तिच्यावर चाकूने चार वार केले. हा हल्ला केल्यानंतर तो फरार झाला.

मालवी मल्होत्रा हीने केलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी आरोपी योगेशविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला आहे. पोलिसांना घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजमधून  पुरावे मिळाले आहेत. हिमाचल प्रदेशातील असलेल्या मालवीने काही बॉलिवूड चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम केलेले आहे.