निखिल अडवाणी दिग्दर्शित ‘मुंबई डायरीज 26/11’ ला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद!

या मालिकेमध्ये ज्यात कोंकणा सेन शर्मा, मोहित रैना, टिना देसाई, श्रेया धन्वंतरी, सत्यजित दुबे, नताशा भारद्वाज, मृण्मयी देशपांडे आणि प्रकाश बेलावडी सारखे अनेक प्रतिभावान गुणी कलाकार आहेत.

    अमेझॉन प्राइम व्हिडीओच्या बहुप्रतिक्षित मूळ ‘मुंबई डायरीज 26/11’ चा प्रभावी ट्रेलर अलीकडेच मुंबईतील प्रतिष्ठित स्मारक, गेटवे ऑफ इंडिया येथे लाँच करण्यात आला, त्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.

    निखिल अडवाणी दिग्दर्शित, एमी एंटरनेटमेंटच्या मोनिशा अडवाणी आणि मधू भोजवानी निर्मित आणि निखिल अडवाणी आणि निखिल गोन्सालविस यांनी सहदिग्दर्शित केलेली मुंबई डायरीज 26/11 हा शो, डॉक्टर, परिचारिका, पॅरामेडिकल आणि रूग्णालय कर्मचारी ज्यांनी २६ नोव्हेंबर २००८ साली झालेल्या दहशतावादी हल्ल्यादरम्यान लोकांचे जीव वाचवण्यासाठी अथक परिश्रम घेतले त्यांची अप्रकाशित कथा सादर करते. या मालिकेमध्ये ज्यात कोंकणा सेन शर्मा, मोहित रैना, टिना देसाई, श्रेया धन्वंतरी, सत्यजित दुबे, नताशा भारद्वाज, मृण्मयी देशपांडे आणि प्रकाश बेलावडी सारखे अनेक प्रतिभावान गुणी कलाकार आहेत.

    प्री-प्रोडक्शन दरम्यान, निखिल आडवाणी यांना काही फ्रंटलाइन वॉरियर्स सोबत बोलण्याची संधी मिळाली ज्यांनी, 26/11 च्या आतंकवादी हल्ल्यानंतर मुंबई शहराला वाचवले, त्यांच्या प्रेरक कहाण्या समजून घेतल्या.फ्रंटलाइन वॉरियर्ससोबत झालेल्या इंटेंस भेटीतील आपले अनुभव मांडताना, निखिल म्हणाले,” मी एक मुंबईकर आहे आणि माझे या शहरावर प्रेम आहे आणि हे शंभर टक्के खरे आहे की हे शहर कधीच हरत नाही, कधी झोपत नाही मात्र, आपण त्या लोकांना विसरून जातो जे यासाठी जबाबदार असतात. जेव्हा मी आणि अपर्णा एका शोबाबत विचार करत होतो, तेव्हा आम्ही एक वैद्यकीय नाट्य करण्याचा विचार केला. मी तिला सांगितले की चल आपण त्या लोकांविषयी मांडूयात जे सतत युद्धात कार्यरत असतात आणि आम्ही ‘मुंबई डायरीज’मध्ये हे मांडण्याचा प्रयत्न केला आहे, अतुलनीय नायकांच्या कथा सांगण्यासाठी ज्याबद्दल खरोखर कोणी बोलत नाही आणि त्यांना खूप हलक्यात घेतले जाते.”

    “सत्य कल्पनेपेक्षा पूर्णतः वेगळे आहे. माझा कल नेहमीच वास्तविक जीवनातील कहाण्यांकडे राहिला आहे. तुम्हाला केवळ असे लोक आणि त्यांच्या अविश्वसनीय कथा ऐकायच्या आहेत. मी खूप भाग्यवान आहे कि मला असे करण्याची संधी मिळत आहे आणि यासाठी अमेझॉन प्राईम व्हिडीओचे धन्यवाद”, निखिल पुढे म्हणाले.

    मुंबई डायरीज 26/11 हे त्या भयानक, अविस्मरणीय रात्रीवर आधारित एक काल्पनिक वैद्यकीय नाट्य आहे ज्याने एकीकडे शहर उध्वस्त केले, परंतु दुसरीकडे येथील लोकांना एकत्र केले आणि कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आपला मार्ग कणखर केला.