tahirakashyap

बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुराना आणि त्याची पत्नी ताहिरा कश्यप एका पोस्टमुळे चर्चेत आले आहेत. नुकाताच ताहिराने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केलाय. या पोस्टमध्ये ताहिराने त्यांच्या घरी आलेल्या नवीन पाहूण्याबद्दल माहिती दिली आहे.

ताहिराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये ती कुत्र्याच्या पिल्लासोबत दिसत आहे. हा फोटो शेअर करत तिने ‘आमच्या कुटुंबातील नवी सदस्य. ही एक मुलगी आहे आणि तिचे नाव पीनट आहे’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे. पीनट ही ताहिरा आणि आयुषमानची नवी पाळीव कुत्री आहे.

ताहिराच्या या पोस्टवर अनेक सेलेब्रेटींनी कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत. लवकरच पिनटला भेटायला येणार आहोत असही या कमेंट्समध्ये अनेक सेलेब्रेटींनी म्हटलय. ताहिराच्या या पोस्टवर आयुषमानचा भाऊ अपारशक्ती खुरानाने कमेंट केली आहे. ‘आम्ही आपल्या बाळाचे स्वागत करण्यासाठी येत आहोत’ असे त्याने कमेंटमध्ये म्हटले आहे.