kanagana ranaut office demolished by bmc

मुंबईत दाखल होण्याआधीच मुंबईतील ऑफिसला मुंबई महानगरपालिकेकडून अनधिकृत बांघकामामुळे तोडफोड करण्यात आली आहे. त्यावर कंगनाने ठाकरे सरकारची बाबरशी तुलना केली आहे. तसेच राम मंदिरची इमारत पाडत आहात असे म्हणून मंदिर तिथेच बनणार असे सूचक वक्तव्य केले आहे.

मुंबई : कंगना रणौत आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यातील वाद आता चांगलाच पेटला आहे. या वादावर आता ठिणगी पडली आहे. कंगना रणौत आज मुंबईत येत आहे. तिच्या मुंबईत दाखल होण्याआधीच मुंबईतील ऑफिसला मुंबई महानगरपालिकेकडून अनधिकृत बांघकामामुळे तोडफोड करण्यात आली आहे. त्यावर कंगनाने ठाकरे सरकारची बाबरशी तुलना केली आहे. तसेच राम मंदिरची इमारत पाडत आहात असे म्हणून मंदिर तिथेच बनणार असे सूचक वक्तव्य केले आहे.


कंगना रणौतने ट्विट करत म्हटले आहे की, ‘मणिकर्णिका फिल्म्समध्ये पहिला चित्रपट अयोध्याची घोषणा करण्यात आली होती. माझ्यासाठी ती इमारत नाही तर स्वतः राम मंदिर आहे. आज बाबर तिथे आला आहे. आज इतिहासाची पुनरावृत्ती होईल, राम मंदिर पुन्हा पाडले जात आहे पण बाबर लक्षात ठेवं हे मंदिर पुन्हा बांधले जाईल. हे मदिर पुन्हा बांधले जाईल, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम’ अशा शब्दांत कंगनाने ठाकरे सरकारवर खोचक टीका केली आहे.