बाबासाहेबांचं ‘शिवचरित्रकथन’ आता ‘ऑडिओबुक’मध्ये!

खुद्द बाबासाहेबांचे ओरिजन सादरीकरण ऐकण्याचा एक विलक्षण नजराणा बाबासाहेबांच्या 'शतकोत्सवी' वर्षानिमित्त शिवप्रेमी साहित्यरसिकांना 'स्टोरीटेल'नं दिला आहे.

    बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास विविध प्रेरणादायी ग्रंथांतून आपल्या समर्थ लेखणीद्वारे तसंच ओघवत्या शैलीच्या माध्यमातून मांडला आहे. बाबासाहेबांच्या प्रेरणादायी आवाजात १९८३ साली ध्वनीमुद्रित केलेल्या संपूर्ण शिवचरित्रकथनाचे पंधरा भाग खास इतिहास प्रेमी, साहित्यरसिकांसाठी स्टोरीटेलनं ‘ऑडिओबुक’मध्ये उपलब्ध करून दिले आहेत.

    खुद्द बाबासाहेबांचे ओरिजन सादरीकरण ऐकण्याचा एक विलक्षण नजराणा बाबासाहेबांच्या ‘शतकोत्सवी’ वर्षानिमित्त शिवप्रेमी साहित्यरसिकांना ‘स्टोरीटेल’नं दिला आहे. ‘शिवचरित्रकथन’ व्याख्यानमालेसोबतच बाबासाहेबांनी सांगितलेल्या हिरकणी, प्रतापराव गुजर, बुलंद बुरुज अशा ऐतिहासिक सात कथाही स्वतंत्रपणे ऐकायला मिळणार आहेत. शिवप्रेमींसोबतच सर्वसामान्य साहित्यप्रेमीही बाबासाहेबांच्या वाणीतून हे ‘शिवचरित्रकथन’ ऐकताना एकरूप होतात.

    ‘शिवचरित्रकथन’मध्ये शिव पुर्वकाळ, शिव जन्म, बालपण, स्वराज्याची प्रतिस्थापना, स्वराज्य विस्तार, अफझल खान स्वारी, अफझल खान पराभव, पावन खिंड, फिरंगोजी नरसाळ, लाल महालावर छापा, सुरतेवर स्वारी, मिर्झाराजे जयसिंग, आग्य्राहून सुटका, तानाजी, राज्याभिषेक असा शिवकालीन इतिहास बाबासाहेबांच्या रसाळ वाणीतून इतिहासप्रेमींना ऐकायला मिळणार आहे.