बाल्की आपल्या आगामी चित्रपटाचं रहस्य उलगडणार…

गुरु दत्त यांना ट्रीब्युट देण्याच्या उद्देशानं बाल्की आपल्या आगामी चित्रपटाचं रहस्य उलगडणार असल्याचं समजतं. या निमित्तानं ते एक वेगळा जॅानरही हाताळणार असल्याची माहिती मिळाली आहे.

    प्रवाहापेक्षा वेगळे आणि आशयघन चित्रपट बनवण्यासाठी प्रसिद्ध असलेले दिग्दर्शक आर. बाल्की नेहमीच काहीतरी नावीन्यपूर्ण संकल्पना पडद्यावर उतरवत असतात. त्यामुळं रसिकांसोबतच सिनेसृष्टीलाही त्यांच्या चित्रपटांबाबत उत्सुकता असते. बाल्कींच्या आगामी चित्रपटाची बातमी आली आहे.

    बॅालिवूडमधील पॅावरफूल कास्टसोबत ते थ्रिलरपट बनवणार आहेत. आजवर या चित्रपटाबाबत बरंच काही लिहून आलं असल्यामुळं रसिकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. हि उत्सुकता अधिक न ताणता आयकॅानिक लेजेंड गुरु दत्त यांच्या स्मृतीदिनी म्हणजेच १० आॅक्टोबरला बाल्की आपल्या आगामी चित्रपटाचं मोशन पोस्टर आणि टायटल रिव्हील करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

    गुरु दत्त यांना ट्रीब्युट देण्याच्या उद्देशानं बाल्की आपल्या आगामी चित्रपटाचं रहस्य उलगडणार असल्याचं समजतं. या निमित्तानं ते एक वेगळा जॅानरही हाताळणार असल्याची माहिती मिळाली आहे.