सैफ आणि करिनाच्या घरी बाप्पा आले, तैमूरही रंगला बाप्पांच्या आगमन सोहळ्यात

बॉलिवूडमधील चर्चेत असलेलं कपल म्हणजे सैफ अली खान आणि करिना कपूरच्या घरीही बाप्पाचं आगमन झालं आहे. करिनाने गणपती पूजेचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, जे सध्या खूप व्हायरल होत आहेत.

    मुंबई : राज्यभरात गणेशोत्सवाची धामधूम आहे. गणेश चतुर्थीच्या उत्सवात सामान्य लोकांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण लाडक्या बाप्पाच्या सेवेत मग्न आहेत. बॉलिवूडमधील चर्चेत असलेलं कपल म्हणजे सैफ अली खान आणि करिना कपूरच्या घरीही बाप्पाचं आगमन झालं आहे.

    करिनाने गणपती पूजेचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, जे सध्या खूप व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये, सैफ, करिनासोबत, त्यांचा मुलगा तैमूर देखील दिसतो, जो बाप्पासमोर हात जोडून पूर्ण भक्तिभावाने बाप्पाला वंदन करत आहे.