भुमिकेसाठी वाट्टेल ते म्हणत बनला मोलकरीण, तुम्ही ओळखलं का त्या अभिनेत्याला!

मालिकेमध्ये ठाकुमाच्‍या घरी मोलकरीण म्‍हणून काम करत असलेली कमला एक महिन्‍याची सुट्टी मागते. आपल्या जागी ती रूपाला आणते. खरं तर रूपा म्‍हणजे अनिरूद्धनेच महिलेचा वेष घेतलेला असतो.

    काही कलाकार असा काही गेअअप करतात की बऱ्याचदा त्यांना ओळखणं कठीण जातं. कलर्सवरील ‘बॅरिस्‍टर बाबू’ या मालिकेत टायटल रोलमध्ये असलेला प्रविष्‍ट मिश्रा लक्ष वेधून घेत आहे. हाच प्रविष्ट आता एका वेगळ्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

    मालिकेमध्ये ठाकुमाच्‍या घरी मोलकरीण म्‍हणून काम करत असलेली कमला एक महिन्‍याची सुट्टी मागते. आपल्या जागी ती रूपाला आणते. खरं तर रूपा म्‍हणजे अनिरूद्धनेच महिलेचा वेष घेतलेला असतो. ठाकुमाला नवीन मोलकरीणबाबत संशय येतो आणि ती तिच्‍यावर बारकाईनं नजर ठेवायचं ठरवते. 

    स्त्री व्यक्तिरेखेतील अनुभवाबाबत प्रविष्ट म्हणाला की, मला आव्‍हानं स्‍वीकारायला आणि काहीतरी नवीन करण्‍याचा प्रयत्‍न करायला आवडतो. या विशिष्‍ट सीनसाठी माझा लुक पूर्णत: बदलण्‍यात आला आणि मला महिलेचा लुक देण्‍यात आला आहे. या अनुभवानंतर मी नेहमी साडी परिधान करणाऱ्या महिलांना सलाम करतो.