मंगेश बोरगावकरचे नवे गाणे ‘बरसात आली’ – प्रेक्षकांसाठी सुरेल अनुभव

पाऊस आल्यावर आठवतात चहा-भजी आणि पावसाची गाणी. त्यात महाराष्ट्राचा लाडका गायक मंगेश बोरगावकरचा आवाजात एखादे गाणे असणे म्हणजेसोन्याहून पिवळे. पावसाच्या सुरुवातीलाच आकार मल्टीमिडीयाने

पाऊस आल्यावर आठवतात चहा-भजी आणि पावसाची गाणी. त्यात महाराष्ट्राचा लाडका गायक मंगेश बोरगावकरचा आवाजात एखादे गाणे असणे म्हणजे सोन्याहून पिवळे. पावसाच्या सुरुवातीलाच आकार मल्टीमिडीयाने प्रेक्षकांसाठी मंगेश आणि मृण्मयीच्या आवाजात सुंदर सुरांची मेजवानी आणली आहे. गाण्याचे नाव आहे ‘बरसात आली’.

बरसात प्रेमाची असते तशी आठवणींचीही असते. मंगेशने गायलेल्या या गाण्यातून प्रेक्षकांच्या आठवणी नक्कीच जाग्या होतील. माथेरान भागात चित्रीकरण झाल्यामुळे पाऊस आणि निसर्गाचा खरेपणा या गाण्यातून प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. मंगेश बोरगावकर नेहमीच वेगवेगळ्या कलाकृती प्रेक्षकांसमोर घेऊन येत असतो. या पावसाळ्यात ‘बरसात आली’च्या निमित्ताने मंगेश आणि त्याच्या टीमने सुरमय बरसात आपल्याला भेट दिली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने जरी दडी मारली असली तरी प्रेमाच्या आणि आठवणींच्या पावसात चिंब करणारं ‘बरसात आली’ हे मराठी प्रेमगीत झी म्युझिक मराठी आणि आकार मल्टीमिडियाच्या माध्यमातून सर्वांसमोर आले आहे. अल्पावधीतच या गाण्याने युट्युबवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. गीतकार संकेत मेस्त्री आणि सिद्धार्थ चितळे यांच्या लेखणीतून साकारलेल्या या प्रेमगीताला भाग्येश पाटील या तरुण संगीतकाराने दिलेले संगीत लक्षवेधी ठरले आहे. सा रे ग म प फेम सर्वांचा लाडका गायक मंगेश बोरगावकर आणि गायिका मृण्मयी भिडे यांच्या स्वरबद्ध गायनाने या गाण्याला जणू चार चांद लावले आहेत. रिद्धेश तरे या तरुण दिग्दर्शकाला अक्षय पाटील आणि क्षितिजा घोसाळकर सारख्या अनुभवी कलाकारांची साथ मिळाल्याने गाण्याचा व्हिडिओही उत्तम झाला आहे.

कथा लेखक सुजित मेस्त्री, छायाचित्रकार जगदीश पाटील, संकलक रिद्धेश तरे यासाेबतच संपूर्ण टीमने घेतलेली मेहनत प्रेक्षकांना प्रेमाच्या बरसातीमध्ये चिंब करण्यात यशस्वी झाली आहे. दरम्यान गाणे युट्यूबसोबतच अन्य ऑनलाईन ऑडिओ स्थळांवर उपलब्ध असून ते पाहण्याचे, ऐकण्याचे तसेच इतरांपर्यंत पोहोचवण्याचे काम निर्माते सिद्धार्थ चितळे यांनी केले. प्रेक्षकांनी गाण्याला दाखवलेल्या प्रेमामुळे आणि गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्यामुळे टीममधील सर्वचं प्रोत्साहित झाले असून यापुढेही यापेक्षाही वेगवेगळ्या धाटणीच्या कलाकृती लोकांच्या भेटीला घेउन येणार असल्याचे दिग्दर्शक रिद्धेश तरे यांनी सांगितले.

बरसात आली गाण्याची लिंक –  https://youtu.be/-iOeoi42lCY