‘थंडगार रस, एकदा तुम्ही प्या हो…’ थेट उसाच्या रसावर आलं भन्नाट रॅप साँग, सोशल मीडियावर धुमाकूळ!

अवघ्या काही दिवसांत हे गाणं सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. आतापर्यंत गाण्याला लाखो व्हय़ुज मिळाले आहेत.

    उन्हाळा आला की सरबत आणि  खास करून उसाच्या रसाची आठवण सर्वांनाच होते. हल्ली सोशल मीडियावरदेखील उसाचा रस एका वेगळ्याच चर्चेत आला आहे. सोलापुरातील बार्शीतल्या काही मुलांनी चक्क उसाच्या रसावर रॅप सॉंग तयार केलय. अवघ्या काही दिवसांत हे गाणं सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. आतापर्यंत गाण्याला लाखो व्हय़ुज मिळाले आहेत.

    ‘डेस्पासितो’ या इंग्रजी गाण्याच्या चालीवर या गाण्याचे सादरीकरण केले आहे. ‘थंडगार रस, एकदा तुम्ही प्या हो इथला ज्यूस… पांडबाच्या रानातला ऊस, तुमचं मन होईल खूश’ अशा या गाण्याच्या ओळी आहेत. उसाच्या रसाचे मार्पेटिंग करण्यासाठी ‘खास रे’ हा यू-टय़ूब चॅनेल चालवणाऱया तरुणांनी या रॅप सॉंगची निर्मिती केली आहे.