‘रंग दे बसंती’ फेम अभिनेता सिद्धार्थचा मृत्यू? ट्विट करत दिली ही माहिती!

अभिनेत्री सौंदर्यायाचं २००४ साली निधन झालं. आरती अग्रवाल हिने २०१५ मध्ये जग सोडलं. पण सिद्धार्थ अजूनही जिवंत आहे. जेव्हा सिद्धार्थला या व्हिडिओंबद्दल कळालं तर त्याने यूट्यूबवर याबाबत जबाब विचारला.

    साउथ फिल्म इंडस्ट्रीचे सुपरस्टार सिद्धार्थबाबत सोशल मीडियावर धक्कादायक वृत्त व्हायरल होत आहे. यावर आता अभिनेत्याने स्वत: व्हायरल होत असलेल्या अफवांना पूर्णविराम दिला आहे. अभिनेत्याने याबाबत स्वत: ट्वीट केलं आहे.  त्याच्या ट्विटमंतर चाहत्यांना दिसाला मिळाला आहे.

    यूट्यूबवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये दहा साऊथ इंडियन सेलिब्रिटींची नावं घेण्यात आली आहे. या सेलिब्रिटींनी कमी वयात जगाला निरोप दिला. या लिस्टमध्ये तमिळ अभिनेता सिद्धार्थ याच्या नावाचाही समावेश आहे. एका फॅनने या व्हिडीओचा स्क्रिनशॉट सोशल मीडियावर शेअर केला आहे. या स्क्रीनशॉटमध्ये अभिनेत्री सौंदर्या, आरती अग्रवाल आणि सिद्धार्थ दिसत आहेत.

    अभिनेत्री सौंदर्यायाचं २००४ साली निधन झालं. आरती अग्रवाल हिने २०१५ मध्ये जग सोडलं. पण सिद्धार्थ अजूनही जिवंत आहे. जेव्हा सिद्धार्थला या व्हिडिओंबद्दल कळालं तर त्याने यूट्यूबवर याबाबत जबाब विचारला. अभिनेता सिद्धार्थ सोशल मीडियावर सक्रिय आहे. ते अनेक विषयांत आपलं मत व्यक्त करतात. त्यांनी कोरोना दरम्यान अनेक विषयांवर आपला आवाज उठवला आहे. इतरच नाही तर वेळेप्रसंगी त्यांनी सरकारवरही टीका केली आहे.