shreya bugde

‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातून श्रेया प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन करताना दिसत आहे. पण संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवणाऱ्या या कॉमेडी क्वीनवर दु:खाचा डोंगर कोसळा आहे.

  भारताला कोरानाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसला आहे. ऑक्सिजन,औषध यांच्या कमतरतेमुळे अनेकांना त्यांचे प्राण गमवावे लागले. अनेक कलाकारांनी आपल्या जवळच्या माणसांना गमवलं. पण हेच कलाकार स्वत:च्या आयुष्यातील दु:ख विसरुन प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. असेच काहीसं घडलय अभिनेत्री श्रेया बुगडेसोबत.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Shreya Bugde Sheth🦄 (@shreyabugde)

  ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातून श्रेया प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन करताना दिसत आहे. पण संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवणाऱ्या या कॉमेडी क्वीनवर दु:खाचा डोंगर कोसळा आहे. या कार्यक्रमातील एका भागामध्ये अभिनेता स्वप्नील जोशी श्रेया बुगडेशी गप्पा मारत होता. दरम्यान त्याने श्रेयाने या विषयी सांगितले. कोरोनामुळे श्रेयाच्या दोन मावशींचे निधन झाले.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Shreya Bugde Sheth🦄 (@shreyabugde)

  श्रेया म्हणाली, ‘माझ्या दोन्ही मावशींना कोरोना झाला होता. जेव्हा कोरोनाची पहिली लाट आली तेव्हा आम्ही खबरदारी घेतली होती. पण दुसरी लाट थेट आमच्या घरावर येऊन धडकली. या लाटेमुळे अवघ्या २४ तासांमध्ये माझ्या दोन्ही मावशींना आमच्यापासून हिरावून नेलं. मी त्या दोघींची खूप लाडकी होते. त्या दोघी आम्हाला अचानक सोडून जातील असा स्वप्नातही विचार केला नव्हता. तो खूप मोठा धक्का होता.’ मावशींविषयी बोलताना श्रेयाला अश्रू अनावर झाले होते.