actor manu mukherjee

बंगाली अभिनेता मनु मुखर्जी(manu mukharjee death) यांचे निधन झाले आहे. ९० वर्षांच्या मनु मुखर्जींचे कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे निधन झाल्याची माहिती मिळाली आहे.

बंगाली अभिनेता मनु मुखर्जी( actor manu mukherjee death) यांचे रविवारी कोलकात्ता येथे कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. त्यांच्या कुटुंबीयांकडून ही माहिती देण्यात आली. गेल्या कित्येक दिवसांपासून मनु मुखर्जी यांची प्रकृती खालावली होती.  उपचारादरम्यान त्यांंनी अखेरचा श्वास घेतला.

बंगाली अभिनेते सौमित्र चटर्जी यांचं १५ नोव्हेंबर रोजी निधन झालं होतं. त्यांच्या निधनानंतर मनु मुखर्जी यांची प्रकृती जास्त खालावली होती. मनु मुखर्जी आणि सौमित्र चटर्जी या दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते.

मनु मुखर्जी यांनी चित्रपटांसोबतच वेबसीरीजमध्येही आपल्या कामाचा  एक वेगळा ठसा उमटवला होता. नील आकाश निकेद्वारे त्यांनी कलाविश्वामध्ये पाऊल ठेवलं. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने मनोरंजन जगतामध्येे शोककळा  पसरली आहे. अनेकांनी त्यांना आदरांजलली वाहिली आहे.