‘भाबीजी घर पर है’ मधील अंगूरी भाभीने सांगितली ‘ही’ खास गोष्ट, प्रत्येक महिलेने धडा घ्यावा असाच आहे हा संदेश

आंतरराष्‍ट्रीय महिला दिनानिमित्त एण्‍ड टीव्‍हीवरील मालिका 'भाबीजी घर पर है'मध्‍ये अंगूरी भाभीची भूमिका साकारणारी शुभांगी अत्रे महिला घेत असलेल्‍या मेहनत, ती प्रशंसा करणा-या काही महिला आणि प्रबळ महिला भूमिका साकारण्‍याबाबत सांगत आहे. तिच्‍यासोबत केलेल्‍या गप्‍पागोष्‍टीदरम्‍यान तिने प्रांजळपणे सांगितलेल्‍या गोष्‍टी:

    १. ‘महिला नेतृत्‍वस्‍थानी: कोविड-१९ काळामध्‍ये समान भविष्‍य संपादित करत आहे’ यावर आधारित आंतरराष्‍ट्रीय महिला दिनाची थीम तुझ्यासाठी किती महत्त्वाची आहे?

    जागतिक स्‍तरावरील आरोग्‍य व सामाजिक कल्‍याण विभागांमधील कर्मचा-यांमध्‍ये महिलांचे प्रमाण सर्वाधिक आहे. जगभरात कोविड-१९चे थैमान सुरू झाल्‍यानंतर महिलांच्‍या भूमिका – आई, मुलगी व केअरगिव्‍हर्सवर सर्वाधिक परिणाम झाला. महिलांना दिवसरात्र काम करावे लागले, कुटुंबाची, विशेषत: घरीच असण्‍यासोबत ऑनलाइन शिक्षण घेत असलेल्‍या मुलांची काळजी घ्‍यावी लागली, तसेच त्‍यांच्‍या व्‍यावसायिक जबाबदारीकडे देखील लक्ष द्यावे लागले. विशेषत: आरोग्‍यसेवा विभागामध्‍ये प्रत्‍यक्ष आघाडीवर काम करणा-या बहुतांश कर्मचारी महिला राहिल्‍या आहेत. जग महामारीपासून सावरण्‍याचा प्रयत्‍न करत असताना महिलांची भूमिका अधिक समान असण्‍यासाठी आणि त्‍यांना अधिक संधी देण्‍यासाठी सहयोगात्‍मक पावले उचलणे आवश्‍यक आहे. लिंग आधारित समान भूमिका व गरजांना अनुसरून महिलांसाठी अधिक स्थिर व दीर्घकालीन भविष्‍य निर्माण करणे तितकेच महत्त्वाचे आहे.

    २. तुझ्यासाठी सर्वात प्रेरणादायी महिला (नेतृत्‍व पदावरील व मनोरंजन क्षेत्रातील) कोण व का?

    वहीदा रेहमानजी आणि शर्मिला टागोरजी या दोन महिलांकडे मी नेहमीच माझे आदर्श म्‍हणून पाहते. मी त्‍यांच्‍या कामाचे कौतुक करते आणि त्‍या आपणा सर्वांसाठी प्रेरणास्रोत आहेत. आजच्‍या पिढीमधील अभिनेत्रींमध्‍ये मला अनुष्‍का शर्मा खूप आवडते. ती एक निश्‍चयी महिला आहे, जिने काहीच न करता तिच्‍या कार्यामधून स्‍वत:चे महत्त्व स्‍थापित केले आहे. या इंडस्‍ट्रीव्‍यतिरिक्‍त मला प्रभावित केलेली महिला म्‍हणजे माझी आई. मी आज जे कोणी आहे, त्‍यासाठी नेहमीच तिची कृतज्ञ राहीन.

     

    ३. मागील एक वर्षापासून आपण देशवासी महामारीचा सामना करत आलो आहोत. जगामध्‍ये लॉकडाऊन व आर्थिक मंदी असण्‍याच्‍या काळादरम्‍यान तू तुझे काम योग्‍यरित्‍या कशाप्रकारे ठेवलेस?

    महामारीदरम्‍यान सर्वकाही ठप्‍प झाले. यामुळे आपल्‍याला आपल्‍या कुटुंबासोबत वेळ व्‍यतित करण्‍यास मिळाला आणि आपण पूर्वी करू न शकलेल्या काही गोष्‍टी करण्‍यास देखील वेळ मिळाला. माझी नेहमीच माझी मुलगी व पतीसेाबत असण्‍याची आणि त्‍यांच्‍यासोबत वेळ व्‍यतित करण्‍याची इच्‍छा होती. लॉकडाऊनदरम्‍यान माझी मुलगी व मी चित्रकला व हस्‍तकलेसह बेकिंगमध्‍ये गुंतून गेलो. आम्‍ही दोघींनी एकत्रित या क्षणांचा आनंद घेतला. मी माझ्या कुटुंबासाठी अनेक नवीन पदार्थ तयार केले आणि नवीन गोष्‍टींसह प्रयोग केला. आम्‍ही गेम्‍स खेळलो, माझ्या चाहत्‍यांच्‍या मनोरंजनासाठी टिकटॉक व्हिडिओज बनवले आणि सोशल मीडियावर लाइव्‍ह जात त्‍यांच्‍यासोबत सवांद साधला. मी कथ्थक देखील शिकवले. मी माझ्या आवडी आणि शारीरिक व मानसिक आरोग्‍यावर फोकस करणे सुरूच ठेवले. मी स्‍वत:ला तंदुरूस्‍त, उत्‍साही व आरोग्‍यदायी ठेवण्‍यासाठी चिंतन, योगासोबत नृत्‍याचा सराव केला. लॉकडाऊननंतर कडक सुरक्षितता नियम आणि नवीन शूटिंग मार्गदर्शकतत्त्वांतर्गत पुन्‍हा सुरूवात करणे सुरूवातीला अवघड गेले. सुरूवातीला अनेक प्रतिबंध व शंका होत्‍या.पण काळासह सर्वकाही सुरळीत वाटू लागले. या महामारीदरम्‍यान मी आपल्‍या जीवनाचा भाग म्‍हणून आव्‍हानांचा स्‍वीकार करत त्‍यांचा धैर्याने सामना करण्‍यास शिकले.

    ४. तुझ्या मते, विशेषत: श्रमजीवी महिलांना काम-जीवन संतुलन राखण्‍याची गरज असल्‍यामुळे तुझ्या वयाच्‍या महिलांना आज सामना करावी लागणारी सर्वात मोठी समस्‍या कोणती?

    कोविड-१९ मुळे जगभरातील जीवन बदलून गेले असताना उच्‍च-मध्‍यमवर्गीय श्रमजीवी महिलांना काम-जीवनामध्‍ये संतुलन राखण्यासंदर्भात अधिक समस्‍येचा सामना करावा लागला. पूर्वापार महिलांवर घरातील बहुतांश कामाची जबाबदारी राहिली आहे. घरातील कामांसोबत व्‍यावसायिक जबाबदा-या पार पाडण्‍याच्‍या तणावामुळे महिलांवर अतिरिक्‍त ताण आला. विशेषत: महिलांना, खासकरून श्रमजीवी महिलांना दीर्घकाळापर्यंत काम करावे लागले आणि त्‍यांच्‍यावर कौटुंबिक जबाबदा-यांचा अधिक भार पडला. हे परिणाम लक्षणीय राहिले आहेत.

     

    ५. तुझ्या भूमिकेने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. तुझ्या मते या भूमिकेची खासियत काय आहे?

    अंगूरी ही कानपूरमधील साधी-भोळी व निरागस महिला आहे, जी सुसंस्‍कृत व पारंपारिक आहे. ती मोहक असण्‍यासोबत कधी-कधी मूर्खासारखी वागते आणि तिच्‍या पती मनमोहन तिवारीची (रोहिताश्‍व गौड) निष्‍ठावान पत्‍नी आहे. अंगूरी ही माझ्या जीवनातील सर्वात लक्षणीय भूमिका राहिली आहे. मी ही भूमिका साकारण्‍याचा पूर्णपणे आनंद घेत आहे. या भूमिकेमुळे मला खूप प्रसिद्धी मिळाली आहे आणि घराघरामध्‍ये माझी ओळख निर्माण झाली आहे. मला इतके प्रेम व प्रशंसा मिळण्‍याचा खूप आनंद होत आहे. पण वास्‍तविक जीवनात मी अंगूरीसारखी नाही.

    ६. तुझ्या मते, स्त्रीमध्‍ये कोणत्‍या क्षमता आहेत?

    स्त्रीने कमकुवत असताना देखील प्रबळ राहण्‍यास शिकले पाहिजे. इतरांप्रती प्रेमळ व उत्तम राहण्‍यासोबत स्‍वत:ची काळजी घेतली पाहिजे. आपली ध्‍येय संपादित करण्‍याप्रती निश्‍चयी राहण्‍यासोबत प्रिजयनांना त्‍यांची ध्‍येय संपादित करण्‍यासाठी पाठिंबा दिला पाहिजे आणि त्‍यांना सक्षम केले पाहिजे.

    ७. एक संदेश, जो तुला सर्व तरूणींना व महिलांना द्यायला आवडेल?

    आपण पुरूषांप्रमाणे समान दर्जा मिळण्‍यासाठी लांबचा पल्‍ला गाठला आहे. आपल्‍यामध्‍ये आपल्‍या महत्त्वाकांक्षेप्रमाणे असण्‍याची क्षमता आहे. आपण ती क्षमता जोपासली पाहिजे आणि त्‍याची प्रशंसा केली पाहिजे. तुमच्‍या सर्व क्षमतांना सर्वतोपरी सर्वोत्तम करण्‍याचा प्रयत्‍न करा.