anup jalota new

आध्यात्मिक गुरू सत्य साईबाबा यांच्या जीवनावर आधारित असलेल्या चित्रपटात अनूप जलोटा मुख्य भूमिका साकारणार आहेत. स्वतः अनूप जलोटा देखील सत्य साई बाबांचे अनुयायी होते, अशी माहिती त्यांनी नुकतीच दिली आहे. सध्या अनुप जलोटा या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सत्य साई बाबा यांच्या वेशातच विविध कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत.

प्रसिद्ध गायक आणि भजन सम्राट अनूप जलोटा अलिकडच्या काळात गायनाव्यतिरिक्त वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहेत. Bigg Boss मध्ये जसलीन माथूर या आपल्या निम्म्या वयाच्या मुलीबरोबर रोमान्स केल्यानंतर आता थेट अभिनय करताना दिसणार आहे. अनोप जलोटा पडद्यावर सत्य साईबाबा साकारताना दिसणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Anup Jalota (@anupjalotaonline)

आध्यात्मिक गुरू सत्य साईबाबा यांच्या जीवनावर आधारित असलेल्या चित्रपटात अनूप जलोटा मुख्य भूमिका साकारणार आहेत. स्वतः अनूप जलोटा देखील सत्य साई बाबांचे अनुयायी होते, अशी माहिती त्यांनी नुकतीच दिली आहे. सध्या अनुप जलोटा या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सत्य साई बाबा यांच्या वेशातच विविध कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Anup Jalota (@anupjalotaonline)

या विषयी बोलताना अनुप जलोटा म्हणाले, ५५ वर्षांपूर्वी सत्य साई बाबांची पहिल्यांदा भेट झाली होती. तेव्हा मी १२ वर्षाचे होते. ‘आम्ही सर्वप्रथम सत्य साईबाबांना लखनऊला असताना भेटलो. यावेळी त्यांनी माझ्या वडिलांचं भजन ऐकलं आणि आम्हाला आशीर्वाद दिला. त्यानंतर साई बाबा माझ्या वडिलांच्या संपर्कात होते. त्यांना भेटण्यासाठी आम्ही विविध ठिकाणी गेलो होतो. मुंबई, बेंगळुरू, दिल्ली आणि उटी या ठिकाणीही त्यांची भेट घेतली होती.’

View this post on Instagram

A post shared by Anup Jalota (@anupjalotaonline)

पुढे चित्रपटाविषयी बोलताना ते म्हणाले, ‘मला वाटतंय की, मी त्यांच्या पात्राला योग्य न्याय देवू शकेल. कारण मीही त्यांच्या अनुयायांपैकीच एक आहे. त्यामुळे मला ते कसे बोलतात, कसे चालतात, कसे बसतात हे माहित आहे.