bharti singh

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सुरू असलेल्या चौकशीत ‘बॉलिवूड ड्रग्ज प्रकरण’ समोर आलं. या चौकशीदरम्यान सारा अली खान, रकुल प्रित सिंह, सिमोन खंबाटा, श्रद्धा कपूर, नम्रता शिरोडकर, दीपिका पदुकोण, दिया मिर्झा यांसारख्या अनेक नामांकित कलाकारांची नावे समोर आली होती. या यादीत भारती सिंह हिचे देखील नाव समोर आले होते.

कॉमेडी क्विन भारती सिंह आणि तीचा पती हर्ष लिंबाचीया या दोघांनाही काही दिवसांपूर्वी ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने अटक केली. दोन दिवस तुरूंगात काढल्यानंतर या दोघांचाही जामिनावर सुटका करण्यात आली. यानंतर पहिल्यांदात भारतीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. भारतीने हर्षबरोबरचा फोटो शेअर करत एक खास कॅप्शन दिलं आहे. ड्रग्ज प्रकरणानंतर भारतीने दिलेलं हे कॅप्शन सगळ्यांच लक्ष वेधून घेत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bharti Singh (@bharti.laughterqueen)

 

भारती हर्षबरोबर फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहीते, कधीकधी काळ आपली परिक्षा घेत असतो, ती आपली कमतरता दाखवण्यासाठी नाही तर आपल्यामधील सामर्थ्य शोधण्यासाठी या आशयाचे कॅप्शन दिले आहे. तिची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bharti Singh (@bharti.laughterqueen)

 

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सुरू असलेल्या चौकशीत ‘बॉलिवूड ड्रग्ज प्रकरण’ समोर आलं. या चौकशीदरम्यान सारा अली खान, रकुल प्रित सिंह, सिमोन खंबाटा, श्रद्धा कपूर, नम्रता शिरोडकर, दीपिका पदुकोण, दिया मिर्झा यांसारख्या अनेक नामांकित कलाकारांची नावे समोर आली होती. या यादीत भारती सिंह हिचे देखील नाव समोर आले होते. चौकशीत भारतीने अंमली पदार्थांचे सेवन करत असल्याची कबुली दिल्यानंतर एनसीबीने तिला ‘एनपीडीएस’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली होती.