Admit your mistake; Comedian Johnny Lever's reaction to the Bharti Singh drugs case

कोरोनाविरुध्दची आईची लढाई आठवल्याने भारती काही वेळ भावनिक झाली. कोरोना आपल्या सगळ्यांना खूप रडवतोय. त्याने आतापर्यंत अनेक जीव घेतले आहेत. माझ्या आईला देखील कोरोनाचा संसर्ग झाला होता.

  प्रसिध्द अॅंकर आणि स्टॅण्डअप कॉमेडीयन भारती सिंग अनेक गोष्टींसाठी सोशल मीडियावर सातत्याने चर्चेत असते. विनोदाच्या शैलीमुळे तिच्या फॅन्सची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. सध्या ती डान्स दिवाने हा रिअलिटी शो होस्ट करीत आहे. या शोच्या एका एपिसोडमध्ये काही क्षण ती फारच भावनिक झालेली दिसली.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by ColorsTV (@colorstv)

  डान्स दिवाने या रिअलिटी शोमध्ये एका स्पर्धकाने 14 दिवसांच्या बाळाचा कोरोनामुळे मृत्यू होतो,आणि त्या बाळाची आई कशी कोसळते, या सत्य घटनेवर आधारित परफॉर्मन्स सादर केला. या परफॉर्मन्सनंतर उपस्थितांचे डोळे पाणावले. यावेळी भारतीने आई होण्याचे प्लॅनिंग कोरोनाच्या स्थितीमुळे कसे पुढे ढकलावंलागलं, असं सांगितलं.हे सांगताना तिला अश्रू अनावर झाले.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by ColorsTV (@colorstv)

  यावेळी भारती सिंग म्हणाली,की आम्ही बाळाला जन्म देण्याच्या विचारात होतो. पण अशा घटना ऐकल्यानंतर आम्ही कुटुंब सुरु करण्याच्या विचारापासून परावृत्त झालो. आम्ही दोघंही मुद्दामच मूल होण्याबाबत बोलत नाही,कारण आम्हाला असं रडायचं नाही.

  यावेळी कोरोनाविरुध्दची आईची लढाई आठवल्याने भारती काही वेळ भावनिक झाली. कोरोना आपल्या सगळ्यांना खूप रडवतोय. त्याने आतापर्यंत अनेक जीव घेतले आहेत. माझ्या आईला देखील कोरोनाचा संसर्ग झाला होता. आमच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं तिनं मला फोन करुन सांगतलं. त्यावेळी ती खूप रडली. त्यावेळी मलाही भिती वाटली की असा फोन मला आला तर मी कायकरावं. कोरोनामुळे सगळं मोडून पडलयं,असं यावेळी भारती सिंगने सांगितलं.