punit pathak marriage

डान्स इंडिया डान्स या रिअलिटी शोमधून प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केलेला डान्सर आणि कोरिओग्राफर पुनीत पाठकने गर्लफ्रेंड निधी मूनी सिंहशी लग्नगाठ बांधली. लोणावळ्यातील एका रिसॉर्टमध्ये हा विवाहसोहळा पार प़डला. पुनीतच्या लग्नाला कॉमेडियन भारती सिंह व तिचा पती हर्ष लिंबाचिया दोघांनी हजेरी लावली होती. पुनीतच्या लग्नात या दोघांनी जोरदार डान्स केला. त्यांचा हा डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

नेटकरी करतात ट्रोल

मात्र या व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर भारतीला डान्स करताना बघून अनेकांनी तिच्यावर निशाणा साधला आहे. ‘माल का कमाल’, असं म्हणत नेटकऱ्यांनी तिच्यावर टीका केली आहे. ‘इतकी नाचू नकोस,  नाहीतर एनसीबी पुन्हा तुला बोलवून घेईल’ असेही कमेंट्स नेटकऱ्यांनी केले आहेत. याआधी गायक आदित्य नारायणच्या लग्नातही भारती व हर्षने जोरदार डान्स केला होता. तेव्हासुद्धा हे दोघं ट्रोल झाले होते.

एनसीबीने केली होती अटक

ड्रग पेडलरने दिलेल्या माहितीनंतर भारतीच्या घरावर आणि ऑफिसवर एनसीबीने धाड टाकली होती. त्या धाडीत एनसीबीला ८० ग्रॅमपेक्षा जास्त गांजा मिळाला होता. भारती आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांना ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने अटक केली होती. विशेष एनडीएस न्यायालयाने या दोघांना जामीन मंजूर केला.