सुशांतच्या स्मृतीप्रित्यर्थ भूमी पेडणेकरनेे घेतला ५५० कुटुंबांना अन्न देण्याचा निर्णय

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू प्रत्येकाच्या मनाला चटका लावून गेला. त्याच्या जाण्याचे दु:ख प्रत्येकालाच वाटत आहे.अशातच अभिनेत्री भूमी पेडणेकर हीने सुशांतच्या स्मृतीप्रित्यर्थ ५५०

 बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू प्रत्येकाच्या मनाला चटका लावून गेला. त्याच्या जाण्याचे दु:ख प्रत्येकालाच वाटत आहे.अशातच अभिनेत्री भूमी पेडणेकर हीने सुशांतच्या स्मृतीप्रित्यर्थ ५५० कुटुंबांना अन्न देण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

भूमी पेडणेकर हीनेे आपल्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहीली आहे. यात भूमी म्हणते की, मी माझ्या मित्राच्या स्मृतीप्रित्यर्थ एकसाथ फाऊंडेशनच्या मदतीने ५५० गरीब कुटुंबांना अन्न देण्याची प्रतिज्ञा करत आहे. आपण सगळे एकत्र येऊन गरजू लोकांविषयी प्रेम व्यक्त करूयात. याची आता आधीपेक्षा जास्त गरज आहे.

दिग्दर्शक अभिषेक कपूर यांची पत्नी प्रज्ञाच्या एकसाथ फाऊंडेशनच्या माध्यमातून भूमी गरीब लोकांना मदत करणार आहे. सुशांत कायम इतरांच्या मदतीसाठी तत्पर असायचा. तो गेल्यानंतर त्याच्या मदतीचा वसा उचलून भूमीने अनोख्या पद्धतीने सुशांतला श्रद्धांजली अर्पण केली आहे.