‘भूत पोलीस’ चित्रपटातील सैफ अली खानचा लूक प्रदर्शित, फोटो शेअर करत बायको करीना म्हणाली….

या चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेल्या सैफ अली खानचा फर्स्ट लुक नुकताच रिव्हील करण्यात आला आहे. हॅारर-कॅामेडी असलेल्या या चित्रपटात सैफनं विभूती नावची व्यक्तिरेखा साकारली आहे.

    मागील बऱ्याच दिवसांपासून प्रदर्शनासाठी सज्ज असलेला ‘भूत पोलीस’ हा आगामी हिंदी चित्रपट लॅाकडाऊन आणि कोरोनाच्या विळख्यात असा काही अडकला की बऱ्याचदा प्लॅनिंग करूनही अद्याप रिलीज होऊ शकलेला नाही. सिनेमागृहं उघडण्याची प्रतीक्षा करणाऱ्या या चित्रपटानंही अखेर डिजिटलची वाट धरत प्रेक्षकांच्या भेटीला येण्याचा निर्णय घेतला आहे. डिस्ने प्लस हॅाटस्टारवर हा चित्रपट प्रदर्शित करण्याची योजना निर्मात्यांनी आखली आहे.या चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेल्या सैफ अली खानचा फर्स्ट लुक नुकताच रिव्हील करण्यात आला आहे. हॅारर-कॅामेडी असलेल्या या चित्रपटात सैफनं विभूती नावची व्यक्तिरेखा साकारली आहे.

    याच कारणामुळं या चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेल्या सैफ अली खानचा फर्स्ट लुक नुकताच रिव्हील करण्यात आला आहे. हॅारर-कॅामेडी असलेल्या या चित्रपटात सैफनं विभूती नावची व्यक्तिरेखा साकारली आहे. टिप्स इंडस्ट्रीज लि. आणि ट्वेल्थ स्ट्रीट एन्टरटेन्मेंटची प्रस्तुती असलेल्या ‘भूत पोलीस’चं दिग्दर्शन पवन कृपलानी यांनी केलं आहे. रमेश तौरानी, अक्षय पुरी यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाची सह-निर्मिती जया तौरानी यांनी केली आहे.

    १० सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात सैफसोबत अर्जुन कपूर, जॅकलीन फर्नांडीस, यामी गौतम आणि जावेद जाफरी या कलाकारांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचं शूटिंग धर्मशाला इथं करण्यात आलं आहे.