‘भूत पोलीस’ चित्रपटातील ‘माया’वी यामी लुक प्रदर्शित!

यामीच्या लुकवरून पडदा उठवण्यात आला आहे. या चित्रपटातील यामीचा मायावी लुक प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'भूत पोलीस'मध्ये यामीनं माया नावाची व्यक्तिरेखा साकारली आहे.

    देखणा चेहरा आणि सहजसुंदर अभिनयाच्या बळावर मॅाडेलिंगपासून अभिनय क्षेत्रातही यशस्वी झालेली यामी गौतम काही दिवसांपूर्वीच दिग्दर्शक आदित्य धरसोबत विवाहबद्ध झाली आहे. नेहमीच काहीतरी हटके करण्याच्या प्रयत्नात असणारी यामी पुन्हा एकदा एका सुंदर लुकमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दुसरा लॅाकडाऊन सुरू होण्यापूर्वीपासून प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत असलेला ‘भूत पोलीस’ हा बहुप्रतिक्षीत हिंदी चित्रपट आता प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे.

    त्यामुळं यात मुख्य भूमिका साकारणाऱ्या कलाकारांचा लुक रिव्हील करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच विभूतीच्या रूपातील सैफ अली खान समोर आला होता. त्यानंतर आता यामीच्या लुकवरून पडदा उठवण्यात आला आहे. या चित्रपटातील यामीचा मायावी लुक प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘भूत पोलीस’मध्ये यामीनं माया नावाची व्यक्तिरेखा साकारली आहे.

    या पोस्टरमध्ये हाती मशाल घेऊन एखाद्या जंगलात कोणाच्या तरी शोधात निघालेली यामी पहायला मिळते. पवन कृपलानी यांचं दिग्दर्शन असलेला हा चित्रपट डिस्ने प्लस हॅाटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. याची निर्मिती रमेश तौरानी, अक्षय पुरी आणि सहनिर्मिती जया तौरानी यांनी केली आहे.