विजय दिवसाची ५० वर्षे, ‘भुज – द प्राइड ऑफ इंडिया’ चित्रपटाचं पोस्टर रिलीज!

युद्ध कथा असलेल्या हा चित्रपट शूरवीर आयएएफ स्वाड्रन विजय कर्णिक यांच्या जीवनप्रवासावरून प्रेरीत आहे. कर्णिक हे भुज एअरपोर्टचे इन चार्ज होते.

    विजय दिवसाची ५० वर्षे सेलिब्रेट करणाऱ्या ‘भुज – द प्राइड आॅफ इंडिया’ या आगामी चित्रपटाची सर्वांनाच प्रतीक्षा होती. अखेर या चित्रपटासाठी स्वातंत्र्यदिनाचा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे. १३ आॅगस्ट रोजी हा चित्रपट डिस्ने प्लस हॅाटस्टारच्या माध्यमातून प्रदर्शित होणार आहे. भारतीय सैनिकांच्या शौर्याची यशोगाथा सांगणारा हा चित्रपट सत्य घटनांवर आधारीत आहे. या चित्रपटात अजय देवगण, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, अॅमी विर्क, नोरा फतेही आणि शरद केळकर आदी कलाकारांच्या भूमिका आहेत.

    युद्ध कथा असलेल्या हा चित्रपट शूरवीर आयएएफ स्वाड्रन विजय कर्णिक यांच्या जीवनप्रवासावरून प्रेरीत आहे. कर्णिक हे भुज एअरपोर्टचे इन चार्ज होते. माधापूर गावातील स्थानिक ३०० महिलांच्या मदतीने त्यांनी अशा प्रकारे आयएएफ एअरबेसची पुर्नबांधणी करत देशाचं रक्षण केलं ते या चित्रपटात पहायला मिळेल. या चित्रपटाचं मोशन पोस्टर रिलीज करण्यात आलं असून, ट्रेलर १२ जुलै रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहे.

    रिलीज करण्यात आलेलं मोशन पोस्टर या चित्रपटात शक्तीशाली अॅक्शन सिक्वेन्सेसच्या जोडीला इमोशन्स, प्रेम आणि देशभक्तीची भावना पहायला मिळेल. अभिषेक दुधैया यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.