अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर आहेत भाऊ- बहिण? वाचा काय आहे प्रकरण!

 फिल्ममेकर आनंद एल. राय यांच्या दिग्दर्शनाखाली बनणाऱ्या 'रक्षा बंधन'साठी अक्षय-भूमी एकत्र आले आहेत. भव्य सेट उभारल्यानं मध्यंतरी हा चित्रपट प्रकाशझोतात आला होता.

    आता आणखी एक गाजलेली जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘टॉयलेट – एक प्रेमकथा’च्या निमित्तानं पहिल्यांदा एकत्र आलेल्या अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर यांना या चित्रपटानं असं काही बंधनात बांधलं आहे की, ही जोडी पुन्हा प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसणार आहे.

     फिल्ममेकर आनंद एल. राय यांच्या दिग्दर्शनाखाली बनणाऱ्या ‘रक्षा बंधन’साठी अक्षय-भूमी एकत्र आले आहेत. भव्य सेट उभारल्यानं मध्यंतरी हा चित्रपट प्रकाशझोतात आला होता. आता २१ जूनपासून शूट सुरू करण्याची योजना आखण्यात आली आहे. या चित्रपटासोबतच अक्षयची निर्मिती असलेल्या ‘भागामती’मध्ये पुन्हा तो भूमीसोबत दिसणार आहे. राय यांनी मागच्या वर्षी रक्षा बंधनच्या मुहूर्तावर ‘रक्षा बंधन’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती.

     भाऊ-बहिणीच्या गोड नात्यावर आधारीत असलेल्या या चित्रपटाची निर्मिती कलर यलो प्रोडक्शन आणि केप ऑफ गुड फिल्म्सच्या बॅनरखाली करण्यात येत आहे. अलका हिरानंदानी आणि आनंद एल. राय यांच्या सहकार्यानं झी स्टुडिओज हा चित्रपट प्रस्तुत करणार आहे.