अभिनेता भूषण कडूच्या पत्नीच्या निधनानंतर व्हायरल होतोय जूना Video, बघून डोळ्यात पाणी येईल!

काही दिवसांपूर्वीच कादंबरी कडू आणि भूषण कडू दोघांनाही कोरोनाची लागण झाली होती. भूषणची प्रकृती सुधारल्याने त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. तर कांदबरी यांची प्रकृती बिघडल्याने मुंबईतील केईएम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले.

    गेल्या काही महिन्यांमध्ये बॉलिवूडपासून मराठी सिनेसृष्टी आणि कलाक्षेत्रात अनेकांना करोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. तर अनेक कलाकारांनी आपल्या जवळच्या माणसांना गमावलं आहे. मराठी विनोदी अभिनेता भूषण कडूच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कोरोनामुळे भूषणच्या पत्नीचं निधन झालंय. काही दिवसांपूर्वीच भूषणची पत्नी आणि त्याला कोरोनाची लागण झाली होती. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान  कादंबरी यांनी अखेरचा श्वास घेतला. ३९ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. सध्या सोशल मीडियावर कादंबरीचा एक जूना व्हिडिओ व्हायरल होत आहे.


    काही दिवसांपूर्वीच कादंबरी कडू आणि भूषण कडू दोघांनाही कोरोनाची लागण झाली होती. भूषणची प्रकृती सुधारल्याने त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. तर कांदबरी यांची प्रकृती बिघडल्याने मुंबईतील केईएम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले. दूर्दैवाने २९ मेला  कादंबरी यांनी अखेरचा श्वास घेतला. भूषण आणि कादंबरी यांना प्रकीर्त हा आठ वर्षांचा मुलगा आहे. भूषण आणि त्याच्या संपूर्ण कुंटबावर दु:खाचा मोठा डोंगर कोसळला आहे.

    कांदबरी ही भूषणची दुसरी पत्नी होती.  अभिनेता भूषण कडूने आजवर त्याच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलंय. ‘कॉमेडी एक्स्प्रेस’ यासोबतच ‘कॉमेडीती बुलेट ट्रेन’, ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ अशा शोसोबतच भुषणने अनेक सिनेमांमधुन प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय.