rhea chakraborty

या पहिल्याच पोस्टरमध्ये सिनेमातील सगळ्या स्टारकास्टचे चेहरे दिसत आहेत. केवळ एक चेहरा चित्रपटातून गायब आहे. हा चेहरा म्हणजे रिया चक्रवर्ती. ‘चेहरे’ सिनेमा २०२० सालातच प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता.

  बिग बींच्या चेहरे सिनेमाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित झालं आहे. अभिनेता इमरान हश्मीने सोशल मीडियावर सिनेमाचं पोस्टर आणि प्रदर्शनाची तारीख जाहीर केलीये. ३० एप्रिलला ‘चेहरे’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात इमरान हाश्मी आणि बिग बी मुख्य भूमिकेत असणार आहेत.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Emraan Hashmi (@therealemraan)

  या पहिल्याच पोस्टरमध्ये सिनेमातील सगळ्या स्टारकास्टचे चेहरे दिसत आहेत. केवळ एक चेहरा चित्रपटातून गायब आहे. हा चेहरा म्हणजे रिया चक्रवर्ती. ‘चेहरे’ सिनेमा २०२० सालातच प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. या सिनेमाच्या स्टारकास्टमध्ये रिया चक्रवर्तीच्या नावाची घोषणा देखील करण्यात आली होती. मात्र आता रिया चक्रवर्तीचा सिनेमातून पत्ता कट केल्याचं पाहायला मिळतंय.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Rhea Chakraborty (@rhea_chakraborty)

  इमरान हाश्मीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये सिनेमातील कलाकरांची नाव टॅग केली आहेत. या नावांमध्येही रियाचं नाव नाही. तर पोस्टरमध्येही फक्त क्रिस्टल डिसूजा ही अभिनेत्री दिसतेय. यावरुन रियाच्या जागी आता क्रिस्टलला रिप्लेस करण्यात आलं आहे का? असा प्रश्न उपस्थित होतोय.