बिग बॉस फेम अभिनेत्री काम्या पंजाबी यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

काम्या त्यांच्या कामात व्यस्त असल्यामुळे त्या राजकरणात लवकर येऊ शकल्या नाहीत. परंतु 'शक्ती - अस्तित्व के एहसास की' या मालिकेची शूटिंग पूर्ण झाल्यामुळे त्यांनी राजकारणात प्रवेश करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

    मुंबई : टीव्ही अभिनेत्री आणि बिग बॉस ७ स्टार काम्या पंजाबी यांनी मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, काम्या त्यांच्या कामात व्यस्त असल्यामुळे त्या राजकरणात लवकर येऊ शकल्या नाहीत. परंतु ‘शक्ती – अस्तित्व के एहसास की’ या मालिकेची शूटिंग पूर्ण झाल्यामुळे त्यांनी राजकारणात प्रवेश करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

    मागील दोन दशकांपासून अभिनेत्री काम्या मनोरंजन सृष्टीचा एक भाग आहे. तिने ‘बनू मैं तेरी दुल्हन’, ‘पिया का घर’, ‘मर्यादा: लेकीन कब तक?’ आणि ‘बेइन्तेहा, अशा अनेक प्रकारच्या मालिकांमध्ये काम करत लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवली आहे. त्यानंतर काम्याने बिग बॉस सिझन ७ या रिअँलिटी शोमध्ये सुद्धा सहभाग घेतला होता. तसेच कॉमेडी सर्कसच्या दुसऱ्या सत्राचा ती भाग होती.

    दरम्यान, काम्याने हिंदी चित्रपटांमध्ये देखील कामं केली आहेत. कहो ना प्यार है, ‘ना तुम जानो ना हम’, ‘यादीं’, ‘फिर भी दिल है हिंदुस्तानी’ आणि ‘कोई मिल गया’ अशा अनेक हिंदी चित्रपटांमध्ये तिने प्रसिद्धी मिळवली आहे.