salman khan bigg boss-14

या सीझनमध्ये एकापेक्षा जास्त कपल्स दिसण्याची शक्यता आहे. काही सामान्य लोकांनाही या शोमध्ये सहभागी होता येणार आहे. नेहमीप्रमाणे सलमान खान हाच या सीझनचा होस्ट असणार आहे.

    बिग बॉसच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. वादग्रस्त रिअलिटी शो बिग बॉसबाबत एक नवी माहिती समोर आली आहे. ही माहिती खऱी निघाली तर चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरणार नाही. बिग बॉसचा पुढचा सिझन ३ नाही तर तब्बल ६ महिने असण्याची शक्यता आहे.

    हे होणार बदल

    या सीझनमध्ये एकापेक्षा जास्त कपल्स दिसण्याची शक्यता आहे. काही सामान्य लोकांनाही या शोमध्ये सहभागी होता येणार आहे. नेहमीप्रमाणे सलमान खान हाच या सीझनचा होस्ट असणार आहे. यावेळी ‘बिग बॉस’ ६ महिने चालणार. अर्थात या फॉर्मेटमध्ये एक ट्विस्‍टही आहे. शोची सुरूवात १२ स्पर्धकांसोबतच होईल. यापैकी ८ स्पर्धक ‘बेघर’ झाल्यानंतर उर्वरित ४ स्पर्धकांसोबत हा शो टीव्ही चॅनल कलर्सवर टेलिकास्ट होईल. इतकेच नाही, ग्रँड प्रीमिअर एपिसोडमध्ये या 4 कंटेस्टंटसोबत काही नवे स्पर्धक घरात एन्ट्री घेतील.

    प्र्रत्येक इविक्शनसोबत घरात एक वाइल्ड कार्ड एन्ट्रीही होणार. म्हणजे एक स्पर्धक बेघर झाला की त्याच आठवड्यात नवा स्पर्धक येणार. मेकर्सचा हा प्लान यशस्वी झाला तर ‘बिग बॉस’मध्ये अनेक नवे व लोकप्रिय चेहरे बघायला मिळू शकतात अद्याप मेकर्सकडून याबाबत कुठलीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.