कोरोनामुळे एकाच दिवशी दोन प्रसिद्ध अभिनेत्रींनी गमावलं आपल्या भावाला, सोशल मीडियावर शेअर केली भावनिक पोस्ट!

‘बिग बॉस १४’ मुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री निक्की तांबोळीने नुकताच आपल्या भावाला गमावलं आहे. निक्कीचा भाऊ अवघ्या २९ वर्षांचा होता. त्याला कोरोनाची लागण झाली होती.

  कोरोनामुळे दिवसेंदिवस परिस्थिती बिघडत चालली आहे. एकीकडे रुग्णांचा आकडा वाढत आहे. तर दुसरीकडे मृतांचा. कोरोनामुळे अनेक बॉलीवूड कलाकरांनी जीव गमावला आहे. तर कित्येक कलाकारांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावलं आहे. ‘बिग बॉस १४’ फेम निक्की तांबोळी आणि अभिनेत्री पिया बाजपेयीया दोघींनी कोरोनामुळे आपल्या भावांना गमावलं आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Nikki Tamboli (@nikki_tamboli)

  ‘बिग बॉस १४’ मुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री निक्की तांबोळीने नुकताच आपल्या भावाला गमावलं आहे. निक्कीचा भाऊ अवघ्या २९ वर्षांचा होता. त्याला कोरोनाची लागण झाली होती. गेली २० दिवस तो कोरोनाशी लढा देत होता. त्याचबरोबर तिने एक भावुक पोस्ट सुद्धा शेयर केला आहे. निक्कीने आपल्या इन्स्टाग्रामवर सांगितलं आहे, की त्याचा भाऊ अनेक शारीरक समस्यांनी त्रस्त होता. त्याला टीबी होता, त्याचं एक फुफ्फुस निष्क्रिय होतं, त्याला निमोनिया झाला होता, आणि २० दिवसांपूर्वी त्याला कोरोनाची लागणससुद्धा झाली होती.

  तर दुसरीकडे दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलेली अभिनेत्री पिया बाजपेयी हिने देखील आपल्या भावाला गमावलं आहे. पियाच्या भावाला सुद्धा कोरोनाची लागण झाली होती. पियाने स्वतः ट्वीट करत आपल्या भावाच्या निधनाची माहिती सर्वांना दिली आहे.