
खीची आई आजारी असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावरील उपचारासाठी राखीला पैशांची गरज आहे. त्यामुळे तिने ही १४ लाख रुपयांची रक्कम घेत हा शो सोडला.
बिग बॉस १४ ची अभिनेत्री रुबिना दिलैक यंदाच्या पर्वाची विजेती ठरली. मात्र, या पर्वात विशेष चर्चा झाली राखी सावंतची. ‘बिग बॉस’चा शो अर्ध्यावर सोडत राखीने बाहेरचा रस्ता धरला. बिग बॉसमधून बाहेर जाण्यापूर्वी तिने १४ लाख रुपये घेतले आणि घराबाहेर पडली.
View this post on Instagram
राखीची आई आजारी असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावरील उपचारासाठी राखीला पैशांची गरज आहे. त्यामुळे तिने ही १४ लाख रुपयांची रक्कम घेत हा शो सोडला. तसंच राखीला पाठिंबा देण्यासाठी बिंदू ‘बिग बॉस’च्या घरात आली होती. त्यावेळी बिंदूनेदेखील राखीला या शोमधून बाहेर पडण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर राखीने निर्णय घेत हा शो सोडला.
View this post on Instagram
‘बिग बॉस १४’ या पर्वाची रुबिना विजेती ठरली असून तिला ‘बिग बॉस’ची ट्रॉफी आणि ४४ लाख रुपये बक्षीस म्हणून मिळालं आहे. खरंतर शोच्या नियमानुसार, रुबिनाला ५० लाख रुपये बक्षीस म्हणून मिळणं अपेक्षित होते. मात्र, या बक्षिसाच्या रकमेतील १४ लाख रुपये राखी सावंतने घेत हा शो सोडला. त्यामुळे राखीने नेमकी ही रक्कम कशासाठी आणि का घेतली ही चर्चा सोशल मीडियावर रंगत आहे.