राखीच्या मदतीला आला भाईजान, व्हिडिओ शेअर करत मानले असे आभार!

राखीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आईचे दोन फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत तिने, ‘माझी आईसाठी प्रार्थना करा. ती कॅन्सरवर उपचार घेत आहे’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.

  नुकतच बिग बॉसचं १४ वं पर्व संपलं. या प्रवात ड्रामाक्वीन राखी सावंतने सहभाग घेतला होता. यावेळी राखीने प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात कोणतीच कसर सोडली नाही. बिग बॉसच्या फिनालेमधून राखीने १४ लाख रूपये घेत घरं सोडलं. त्यावेळी अनेकांच्या भुवया उंचावल्या. पण त्याचं कारण समजल्यावर सगळ्यांनीच राखीचं कौतुक केलं.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511)

  बिग बॉस १४च्या फिनालेमध्ये राखी सावंतचा भाऊ राकेशने हजेरी लावली होती. त्यावेळी त्याने आई ICUमध्ये असल्याचे सांगितले होते. आता राखीने सोशल मीडियावर आईचा फोटो शेअर करत माझ्या आईसाठी प्रार्थना करा असे म्हटले आहे. आता राखीने व्हिडीओ शेअर करत बॉलिवूड अभिनेता सलमान खानचे आभारा मानले आहेत.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511)

   

  राखीने नुकताच तिच्या इन्स्टाकग्राम अकाऊंटवर आईसोबतचा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये राखीची आई सलमानचे आभार मानताना दिसत आहे. तसेच त्यांना ज्यांनी कोणी मदत केली आहे त्यांचे देखील त्यांनी आभार मानले आहेत. राखीच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत तिची आई लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना केली आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511)

   

  राखीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आईचे दोन फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत तिने, ‘माझी आईसाठी प्रार्थना करा. ती कॅन्सरवर उपचार घेत आहे’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे. हा फोटो पाहून चाहते भावूक झाले आहेत. बिग बॉसच्या घरात राखी सावंतने व्यक्तिगत आयुष्यात अनेक संकटाचा सामना करत असल्याचे सांगितले होते. पण घरातील इतर स्पर्धकांनी तिची ही गेम खेळण्याची पद्धत असल्याचे म्हटले होते. पण तसे नव्हते. खऱ्या आयुष्यात राखीची आई कॅन्सरशी लढा देत असल्याचे समोर आले आहे.