बिग बॅास १५ ची तयारी सुरू, पहिल्या स्पर्धकाचं नाव आलं समोर, ही अभिनेत्री घालणार घरात राडा!

 'बिग बॅास १५'मध्ये थोडा बदल करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. 'बिग बॅास १५'मध्ये सहभागी होण्यासाठी आपल्याशी संपर्क साधण्यात आल्याचं अभिनेत्री नेहा मर्दानं सांगितलं आहे.

    एका मागोमाग कमालीच्या सीझन्सनंतर ‘बिग बॅास’ हा रिअॅलिटी शो आता १५व्या पर्वाकडे वळला आहे. वादग्रस्त वक्तव्य, आक्षेपार्ह सीन्स आणि भांडणांमुळं चर्चेत राहणारा हा शो आता नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘बिग बॅास १५’ची तयारी सुरू झाली असून, यात सहभागी होणाऱ्या सेलिब्रिटीजची नावंही हळूहळू समोर येऊ लागली आहेत.

     ‘बिग बॅास १५’मध्ये थोडा बदल करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. ‘बिग बॅास १५’मध्ये सहभागी होण्यासाठी आपल्याशी संपर्क साधण्यात आल्याचं अभिनेत्री नेहा मर्दानं सांगितलं आहे. ‘बिग बॅास’च्या घरी जाण्याची आॅफर स्वीकारून शो जिंकण्याचा आपण विचार करत असल्याचं नेहानं एका मुलाखतीत म्हटलं आहे.

    नेहाबाबत सांगायचं तर तिनं कलर्स वाहिनीवरील ‘बालिका वधू’मध्ये गहनाची भूमिका साकारली आहे. याशिवाय ‘डोली अरमानों की’ ही तिची मालिका गाजली आहे. सध्या ती झी टीव्हीवर ‘क्यूं रिश्तों में कट्टी बट्टी’ या शोमध्ये झळकत आहे. आता नेहाला ‘बिग बॅास’च्या घरी जाण्याचे वेध लागले आहेत. भल्याभल्यांचे खरे चेहरे दाखवणारं बिग बॅासचं घर नेहाचे कोणते अंतरंग दाखवतं ते पहायचं आहे.