रिया चक्रवर्ती ते दिशा वाकानीपर्यंत हे १५ स्पर्धक सहभागी होणार BIGG BOSS मध्ये, नावं वाचून हैराण व्हाल!

या सीझनमध्ये बिग बॉसच्या घरात कोण जाणार याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे. नुकतीच घरातील संभाव्य सदस्यांची यादी समोर आली आहे.  

  छोट्या पडद्यावरील सगळ्यात वादग्रस्त कार्यक्रम म्हणजे ‘बिग बॉस’, लवकरच बिग बॉसच १५ वं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या शो लोकप्रियता प्रचंड आहे त्यामुळे नेहमी वादात सापडत असला तरी सेलेब्रेटी हा शो करण्यासाठी तयार होतात. या सीझनमध्ये बिग बॉसच्या घरात कोण जाणार याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे. नुकतीच घरातील संभाव्य सदस्यांची यादी समोर आली आहे.  

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Rhea Chakraborty (@rhea_chakraborty)

  छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री निया शर्मा, वीजे आणि अभिनेत्री अनुषा दांडेकर, ‘इश्कबाज’ या मालिकेमधून नावारुपास आलेली अभिनेत्री सुरभी चंदना, छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता पार्थ समथान, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील दयाबेन म्हणजेच अभिनेत्री दिशा वकानी, अभिनेता कृष्णा अभिषेक, अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर चर्चेत आलेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती, अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी, अभिनेत्री नेहा मर्दा, अभिनेत्री दिशा परमार, अभिनेता मोहसिन खान या घरात दिसण्याची शक्यता आहे.

  आता ही यादी समोर आल्यावर ही नावं वाचल्यावर काही चाहत्यांना आनंद झाला तर काहींना धक्का बसला आहे. रिया, कृष्णा अभिषेकीचं नाव वाचल्यावर प्रेक्षकांच्या भूवया उंचावल्या आहेत.