ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी बिग बॉस फेम अभिनेता अरमान कोहलीला अटक, NCBची धडक कारवाई

एनसीबीच्या मुंबई पथकाने काल (शनिवार) सकाळी एका तस्कराला अटक केली आहे.  बॉलिवूडमधील काही जणांशी संबंध असल्याची माहिती मिळताच एक पथक पश्चिम उपनगरातील अरमान कोहलीच्या घरी पोहोचले. तेथे छापेमारी करून अनेक वस्तू जप्त केल्या व त्याला ताब्यात घेतले.

    मुंबई : ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी बॉलिवूडवर पुन्हा एकदा एनसीबीने धाडसत्र सुरू केलं आहे. बिग बॉस फेम अभिनेता अरमान कोहलीला एनसीबीकडून ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी अटक करण्यात आली आहे. टिव्ही अभिनेता गौतम दीक्षितला अटक केल्यानंतर काल (शनिवार) बॉलिवूड अभिनेता अरमान कोहलीच्या घरावर एनसीबीकडून छापा टाकण्यात आला आहे. अरमानला अटक करण्यात आली असून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

    एनसीबीच्या मुंबई पथकाने काल (शनिवार) सकाळी एका तस्कराला अटक केली आहे.  बॉलिवूडमधील काही जणांशी संबंध असल्याची माहिती मिळताच एक पथक पश्चिम उपनगरातील अरमान कोहलीच्या घरी पोहोचले. तेथे छापेमारी करून अनेक वस्तू जप्त केल्या व त्याला ताब्यात घेतले.

    दरम्यान, बिग बॉस या लोकप्रिय शोमध्येही अरमान कोहली याने भाग घेतला होता. बेकायदा दारुसाठा केल्याप्रकरणी सुद्धा त्याला याआधी अटक करण्यात आली आहे. त्याचप्रकारे एका महिला फॅशन डिझाईनरशी दुर्व्यवहार केल्याप्रकरणीही अरमानवर वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

    टीव्ही कलाकार गौरव दीक्षितला शुक्रवारी अटक करण्यात आली असून त्याला सोमवारपर्यत पोलीस कोठडी मिळाली आहे. काही महिन्यांपूर्वी गौरवच्या घरावर छापा घालून एमडी, ड्रग्स, चरस जप्त केले होते.