बिग बॉसमुळे चर्चेत आलेली  प्रसिद्ध गायिका वैशाली माडेचा राष्ट्रवादीत प्रवेश?

गायिका वैशाली माडे अलीकडेच मराठी बिग बॉसमुळे चर्चेत आल्या होत्या. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या बातमीमुळे पुन्हा चर्चेत आल्या आहेत.

    सध्या चित्रपट विश्वातील अनेक कलाकार राजकीय क्षेत्रात प्रवेश करत आहेत. अनेक मराठी कलाकारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आता मराठी चित्रपट विश्वातील प्रसिद्ध गायिका वैशाली माडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. याबाबतची माहिती चित्रपट, कला, साहित्य, सांस्कृतिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी दिली आहे.

    लोकप्रिय गायिका वैशाली माडे यांचा ३१ मार्च रोजी मुंबईतील राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात पक्ष प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी राष्ट्रवादीचे बडे नेतेही उपस्थित राहणार असून दुपारी १२ वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे.

     

    गायिका वैशाली माडे अलीकडेच मराठी बिग बॉसमुळे चर्चेत आल्या होत्या. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या बातमीमुळे पुन्हा चर्चेत आल्या आहेत. वैशाली माडे यांनी आतापर्यंत अनेक मराठी चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत. त्यांनी आता राजकीय पक्षाचा झेंडा हाती घेतल्यानंतर त्यांच्याकडे कोणती जबाबदारी सोपवली जाईल, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.