बिग बॉसच्या घरात जुळलेलं शिव-विणाचं नातं संपुष्टात? चाहत्यांना पडला प्रश्न, अखेर शिवनं दिलं स्पष्टीकरण!

लॉकडाउननंतर आम्ही दोघंही लॉंग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये आहेत. अंतर वाढलं की वाद होतात, रुसवे फुगवे होतात, एकमेकांची समजून काढणंही होतं आणि त्यामुळे प्रेमही वाढतं.

  गेल्या काही दिवसात मराठी चित्रपटसृष्टीतले अनेक कलाकार विवाहबंधनात अडकले आहेत. मराठी बिगबॉसच्या सिझन दोनचा विजेता शिव ठाकरे अभिनेत्री वीणा जगतातसोबत नात्यात आहे. त्यांचं प्रेम बिगबॉसच्या घरात फुललं. त्यानंतर अनेकदा ते एकत्र दिसले. ते आपल्या चाहत्यांसाठी नेहमी फोटो शेअर करत असतात.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Shiv Thakare (@shivthakare9)

  पण गेले काही दिवस ते दोघे कुठेच एकत्र दिसले नाहीत. त्यांनी सोशल मीडियावर फोटोही शेअऱ केले नाहीत त्यामुळे त्या दोघांच ब्रेकअप झाल्याची चर्चा रंगली. या चर्चांना शिवने पूर्णविराम दिला आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Shiv Thakare (@shivthakare9)

  तो म्हणाला, लॉकडाउननंतर आम्ही दोघंही लॉंग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये आहेत. अंतर वाढलं की वाद होतात, रुसवे फुगवे होतात, एकमेकांची समजून काढणंही होतं आणि त्यामुळे प्रेमही वाढतं. सध्या करिअरवर लक्ष केंद्रित करून योग्य त्या वेळी लग्नाचा विचार करून लग्नबांधनात अडकायला आवडेल.’

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Shiv Thakare (@shivthakare9)