‘बिग बॉस मराठी सिझन 3’ कलर्स मराठीवर ! कोणाला मिळणार बिग बॉसच्या घरात ENTRY

१९ सप्टेंबरपासून कलर्स मराठीवर बिग बॉस चे तिसरे पर्व सुरु होणार आहे.  बिगबॉस मराठीच्या तिसर्‍या पर्वाचे सूत्रसंचालन महेश मांजरेकर करणार असून त्यांनी नुकतेच या कार्यक्रमाच्या प्रोमोचे शूट संपवले. 

    छोट्या पडद्यावरील वादग्रस्त कार्यक्रम म्हणजे बिग ब़ॉस. पहिला आणि दुसरा सीझन प्रचंड गाजल्यानंतर आता मराठी बिग बॉसचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. १९ सप्टेंबरपासून कलर्स मराठीवर बिग बॉस चे तिसरे पर्व सुरु होणार आहे.  बिगबॉस मराठीच्या तिसर्‍या पर्वाचे सूत्रसंचालन महेश मांजरेकर करणार असून त्यांनी नुकतेच या कार्यक्रमाच्या प्रोमोचे शूट संपवले.

    संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षक खूप उत्सुक आहेत या कार्यक्रमाच्या नव्या सिझनसाठी. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये या वेळेस कोणते ख्यातनाम व्यक्ती जातील याविषयाचे तर्क बांधण्यास देखील सुरुवात झाली आहे. तेव्हा लवकरच कळेल कोण कोण असणार आहेत या सिझनमधील सदस्य, कसे असणार यावेळेसचं घरं ! या सर्वांची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

    ‘बिग बॉस मराठी’चं पहिलं पर्व १५ एप्रिल २०१८ रोजी पार पडलं. या पर्वामध्ये अभिनेत्री मेघा धाडे विजयी ठरली. त्यानंतर हे पर्व संपत नाही तर दुसरं पर्वही प्रेक्षकांच्या भेटीला आलं. या पर्वामध्ये शिव ठाकरे विजेता ठरला. हे दोन्ही पर्व प्रचंड गाजले होते. त्यामुळे आता प्रेक्षक तिसऱ्या पर्वाची आतुरतेने वाट पाहत आहेत.