‘मला मुल पाहिजे’, Bigg Boss OTT च्या घरात शमिताने राकेशकडे व्यक्त केली इच्छा!

बऱ्याचवेळा राकेश आणि शमिता एकमेकांना आपल्या मनातील गोष्टी सांगताना दिसतात. आता शमिताने चक्क राकेशला मुलांविषयी सांगितलं आहे.

    बिग बॉस ओटीटी हा सध्या प्रचंड लोकप्रिय ठरलेला शो आहे. या स्पर्धेतील स्पर्धकांची नेहमी चर्चा होते. पण यात सुद्धा राकेश बापट आणि शमिता शेट्टी ही जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडते. हे दोघं नेहमी चर्चेत असतात. त्यांच्यातला रोमान्स प्रेक्षकांना प्रचंड आवडतो. बऱ्याचवेळा राकेश आणि शमिता एकमेकांना आपल्या मनातील गोष्टी सांगताना दिसतात. आता शमिताने चक्क राकेशला मुलांविषयी सांगितलं आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

    एका फॅनक्लबने हा व्हिडिओ शेअर केला आहे. ‘मी कधी कधी विचार करते की मला मुल पाहिजे. पण मग मला असं वाटतं की या वयात दोन मुल. मग तुम्ही असं दुसऱ्या व्यक्तीवर अन्याय करू शकत नाही. मी माझी बहिणी शिल्पाशिवाय राहू शकत नाही.’ या व्हिडिओत शमिता राकेशला सांगताना दिसतेय.

    राकेश आणि शमिता यांच्यात असलेलं प्रेम हे प्रेक्षकांना दिसते. राकेश जेव्हा दिव्याशी बोलतो तेव्हा शमिताला राग येतो. राकेशला नॉमेनेशनपासून वाचवण्यासाठी शमिताने तिच्या कुटुंबाने दिलेले पत्र न वाचता फाडले आणि स्वत: नॉमिनेट झाली. अनेकदा राकेशने बिग बॉसच्या घरात शमिताला किस केलं ते व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.