राकेशच्या खिशात दिव्याचं लिपबाप सापडलं आणि शमिता भडकली, मग झालं असं की….

नुकत्याच व्हायरल झालेल्या प्रोमोत राकेशच्या खिश्यात दिव्याचं लिपबाम पाहून शमिता त्याच्यावर चिडली आहे.

    बिग बॉस ओटीटी हा शो सध्या चर्चेत आहे. खास करून शमिता आणि राकेशच्या केमिस्ट्रीमुळे हा शो चर्चेत आला आहे. राकेश सतत शमिताबरोबर फ्लर्ट करताना दिसतो. त्यांचा रोमॅण्टीक अंदाज बघून अनेकांना ते प्रेमात असल्याचं म्हटलं होतं. ते सतत एकत्र वेळ घालवताना दिसतात. पण नुकत्याच व्हायरल झालेल्या प्रोमोत राकेशच्या खिश्यात दिव्याचं लिपबाम पाहून शमिता त्याच्यावर चिडली आहे.

    सगळे स्पर्धक लिविंग एरियामध्ये बसले आहेत. तिकडे शमिता आणि राकेश बापट पण आहेत. तेवढ्यात राकेशच्या खिशातून लिप बाम बाहेर पडतो. ते प्रतिक सहजपाल उचलतो. आणि त्याला ते शमिताचे आहे असे वाटते. त्यानंतर घरातील इतर स्पर्धकही राकेला चिडवायला लागतात. त्यावर राकेश सर्वांना सांगतो की हे लिपबाम शमिताचं नाही तर दिव्या अग्रवालचं आहे.

    तेव्हा दिव्या त्या मागचं कारण सांगते, तिच्याकडे एक एक्स्ट्रा होतं म्हणून त्याने राकेशला दिलं. राकेशला गरज होती त्याने मागितले आणि मी दिले’, असे दिव्या म्हणाली. ते ऐकून शमिताला राग येतो. शमिता सर्वांना सांगते की मी राकेशची गर्लफ्रेंड नाही. मला चिडवणे बंद करा. तेवढ्यात दिव्या शमिताला म्हणते, ‘जर तू राकेशची गर्लफ्रेंड झालीस तर चांगलं होईल.’ ते ऐकून राकेश शमिताला विचारतो की असे काही होऊ शकते का? त्यावर शमिता बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यावर याचा विचार करेन असे म्हणते.