शमिताला किस करण्यावरून राकेशला विचारला करणने प्रश्न, ‘संडे का वार’ ठरला स्पेशल!

 ‘बिग बॉस ओटीटी’ हा शो सुरु झाल्यापासून शमिता आणि राकेश चर्चेत आहेत. दोघे सतत एकमेकांसोबत दिसतात.

    ‘बिग बॉस ओटीटी’ मध्ये काल संडे का वार एपिसोड रंगला. नेहमीप्रमाणे करण जोहर स्पर्धकांना भेटला. हा संडे का वार राकेश आणि शमितासाठी खास ठरला. या एपिसडोमध्ये करण सतत राकेश आणि शमिताला चिडवत होता.

    शमिताने राकेशला शरारा शरारा या तिच्या गाण्याची हूक स्टेप शिकवली आणि राकेशचं कोतुकही केलं. यावेळी करणने राकेशला शमिताविषयी काही गोष्टी सांगायला सांगितल्या त्यावर राकेश म्हणाला, मला वाटतं की ती खूप सुंदर,खूप हॉट, आणि खूप काळजी घेणारी आहे. तिच्यात अनेक चांगल्या गोष्टी आहेत.

    ‘बिग बॉस ओटीटी’ हा शो सुरु झाल्यापासून शमिता आणि राकेश चर्चेत आहेत. दोघे सतत एकमेकांसोबत दिसतात. एवढंच नाही तर राकेशने शमिताला फूट मसाज दिली आणि तिच्या गालावर टॅट्टू पण काढला. हे सगळं त्या दोघांनी एका टास्क दरम्यान केलं. प्रेक्षकांना राकेश आणि शमिताची केमिस्ट्री प्रचंड आवडली आहे.