तुम्ही नाहीत ना ‘तो’ बिनोद ? मुंबई, नागपूर आणि जयपूर पोलीस ज्याला शोधतायेत ..काय आहे प्रकरण जाणून घ्या

सध्या भारतात सोशलमिडीयावर सर्वत्र बिनोदचा शोध घेतला जात आहे. कोण आहे हा बिनोद? हा तोच बिनोद ज्याच्यामुळे चक्क पेटीएमनं स्वतःच्या  ट्विटर हँडलंच नाव बदललं.विशेष म्हणजे मुंबई, नागपूर आणि जयपूर पोलीसही या बिनोदबद्दल बोलत आहेत.वाचकांनो,  पेटीएमने हे का केलं ते माहित नाही पण आता या बिनोद अर्थात #Binod ने इन्स्टा,ट्विटर ,युट्युब असा सगळीकडेच धुमाकूळ घातला आहे.

काय आहे हे #Binod प्रकरण 

 मीमच्या जगतात सध्या बिनोद टॉप प्रायोरीटी झाला आहे. तर बिनोद शोधण्यासाठी आधी नक्की घडलं काय ते जाणून घ्यावं लागेल. झालं अस की , युट्यूबवर ‘स्ले पॉईंट’ नावाचं एक चॅनल आहे. अभ्युदय आणि गौतमी नावाच्या दोन तरुणांनी हे चॅनल काही वर्षांपूर्वी सुरू केलं होतं. ते इंटरनेटवरच्या ट्रेंडिंग विषयांवर काही रंजक व्हीडिओ बनवतात.काही दिवसांपूर्वी त्यांनी  भारतीय युट्यूब चॅनेल्सच्या कमेंट सेक्शनमध्ये काय असतं हे दाखवलं होत.  ‘Why Indian Comments Section is Garbage (BINOD)’ असं टायटल देऊन त्यांनी हा व्हिडिओ तयार केला आणि त्यामध्ये कमेंटमध्ये करण्यात आलेल्या वेगवेगळ्या विचित्र कमेंट वाचल्या आहेत. यातच एक कमेंट होती. बिनोद थारू नावाच्या युजरनं “बिनोद”ही इतकीच  कमेंट  पोस्ट केली होती. विशेष म्हणजे या बिनोद थारूने सर्वत्र अशीच स्वतःच्या नावाची बिनोद अशी कमेंट केली आहे. आणि मग सुरु झाला मीमचा धुव्वादार पाऊस ..  म्हणूनच सगळीकडे तुम्हाला रिप्लाय किंवा कॉमेंट्स मध्ये ‘BINOD’. दिसत असणार. यातच एकाने पेटीएमला चॅलेंज दिलं आणि पुन्हा बिनोदची चर्चा सुरू झाली.

मुंबई, नागपूर आणि जयपूर पोलीसही ‘बिनोद’बद्दल बोलत आहेत 

भारतीय लोक कॉमेंट बॉक्समध्ये काहीही कॉमेंट करतात हे स्ले पॉईंटने  लक्षात आणून दिल्यावर ‘बिनोद’ अवघ्या भारतभर पसरला आणि हा हा म्हणता सगळीकडे ‘बिनोद’ आणि फक्त बिनोदचे  मिम्स  सुरु झाले. मग यात कायम सतर्क असणारी पोलीस यंत्रणा कशी मागे राहील. त्यांनीही ट्विटर वर ‘बिनोद’ बद्दल ट्विट केले . यात मुंबई, नागपूर आणि जयपूर पोलीस आघाडीवर आहेत.