हेमांगीचा ‘तो’ Video बघताच, भाजप नेत्या चित्रा वाघ भडकल्या दिली अशी प्रतिक्रिया!

एका पोळ्या लाटण्याच्या पोस्टवर नजर न टाकता नको त्या गोष्टींकडे बारीक लक्ष देणे, अश्लीक कमेंट करणे.. लोकांनी सगळ्या पातळ्या सोडल्या आहेत.

    सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री हेमांगी कवीची ‘बाई, बुब्स आणि ब्रा’ ही फेसबुक पोस्ट चर्चेत आहे. तिच्या पोस्टवर अनेक कलाकारांनी कमेंट करत तिला पाठिंबा दिला आहे. आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. हेमांगीला ट्रोल करणाऱ्यांना चित्रा वाघ म्हणाल्या, ‘हेमांगीला ट्रोल करणाऱ्या मंडळींना तिचे अभिनय कौशल्य किंवा ती नेहमी व्हिडीओ शेअर करत सामाजिक विषयावर बिनधास्तपणे मत मांडते हे का दिसत नाही? आपण बाईच्या दिसण्यावर चर्चा करतोय का? पण बाईच्या असण्यावर काही चर्चा करणार आहोत की नाही? तिने केलेल्या कमावर कधी चर्चा होणार आहे की नाही? बायकांना किती दिवस बंधनात ठेवणार?’

    हेमांगीने साध्या पोळ्या लाटतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. त्या व्हिडीओमुळे तिला ट्रोल केले गेले. त्यावर अनेक वाईट कमेंट केल्या गेल्या. लोकांची नजर सुधारण्याचे नावच घेत नाही. इन्स्टाग्राम हे सर्वांसाठी असलेले एक मनोरंजनाचे माध्यम आहे. एका पोळ्या लाटण्याच्या पोस्टवर नजर न टाकता नको त्या गोष्टींकडे बारीक लक्ष देणे, अश्लीक कमेंट करणे.. लोकांनी सगळ्या पातळ्या सोडल्या आहेत.

    काय घडलं नेमकं

    इन्स्टाग्राम अकाऊंटवर “गोल पोळ्याचं गुपित!” असे कॅप्शन देत एक व्हिडीओ हेमांगीने शेअर केला होता. या व्हिडीओवर काही नेटकऱ्यांनी हेमांगीला कपड्यांवरून ट्रोल केले. पण हेमांगी शांत बसली नाही तिने ट्रोल करणाऱ्यांना चांगलेच सुनावले आहे. “हो मला स्तन आहेत. त्याला स्तनाग्रेही आहेत अगदी पुरुषांसारखी! जसे चालताना माझे हातपाय हलतात तसचे काम करताना माझे स्तन हलतात. कारण मी सस्तन प्राणी आहे. मादी आहे! ज्यांचे हलत नाहीत अशांना माझा त्रिवार सलाम. आता मी घरात, बाहेर, सोशल मीडियावर अंर्तवस्त्र (ब्रा) घालायची कि नाही ही माझी पंसत आहे.”