‘ब्लॅक पँथर’फेम हॉलिवूड सुपरस्टार चॅडविक बोसमन यांचं निधन

बोसमन हे कोलोन कॅन्सरने ( colon cancer) त्रस्त होते. मागील चार वर्षांपासून कर्करोगाशी लढा देत होते. मात्र, कर्करोगामुळे बोसमन यांनी लॉस एंजलिस येथे राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. यावेळी त्यांची पत्नी आणि कुटुंबातील अन्य सदस्य त्यांच्या सोबत होते.

ब्लॅक पँथर (Black Panther) फेम हॉलिवूड सुपरस्टार(Hollywood Superstar) चॅडविक बोसमन(Chadwick Boseman) यांचं काल शुक्रवारी  निधन झालं आहे. ते ४३ वर्षांचे होते. बोसमन हे कोलोन कॅन्सरने ( colon cancer) त्रस्त होते. मागील चार वर्षांपासून कर्करोगाशी लढा देत होते. मात्र, कर्करोगामुळे बोसमन यांनी लॉस एंजलिस येथे राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. यावेळी त्यांची पत्नी आणि कुटुंबातील अन्य सदस्य त्यांच्या सोबत होते.

सुपरस्टार बोसमन हे मार्वल स्टुडिओच्या ‘ब्लॅक पँथर’मधून विशेष लोकप्रिय झाले होते. ब्लॅक पँथर या चित्रपटात ‘सम्राट टी-चाला’ (King T’Challa) ही भूमिका त्यांनी साकारली होती. तसेच त्यांनी ‘42’,‘Get on Up’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांचा शेवटचा चित्रपट ‘Da 5 Bloods’ होता. तसेच हा चित्रपट याच वर्षी २०२० ला प्रदर्शित करण्यात आला होता.