‘म्हणून घेतला सरोगसीद्वारे बाबा होण्याचा निर्णय’, अखेर लग्न न करण्यामागचं कारण तुषार कपूरने सांगितलं!

मी प्रत्येक दिवशी माझ्या मुलासोबत नवीन काहीतरी शिकत असतो. याशिवाय कुठला पर्याय मला निवडायचा नाही. मी स्वत:ला इतरांसोबत शेअर करू शकत नाही.

  बॉलिवूडमध्ये असे अनेक अभिनेते आहेत ज्यांनी आजपर्यंत लग्न केलेलं नाही. सलमान खान, अक्षय खन्ना यासराख्या आधीच्या पिढीतील अभिनेत्यांसह उद्य चोप्रा, अभय देओल,रणदीप हुडा हे कलाकार अद्याप विवाहबंधनात अडकलेले नाहीत. तर काहींनी लग्नाच्या बेडीत न अडकताच काही कलाकारांनी पितृत्व स्विकारलं आहे. यातील अभिनेता तुषार कपूर हा त्यापैकी एक. नुकतचं तुषारने आपण कधीच लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Tusshar Kapoor (@tusshark89)

  नुकतंच एका मुलाखतीत तुषार कपूरला विचारण्यात आलं. यावर बोलताना तुषार म्हणाला, “मी कधीच लग्न करणार नाही, कारण माझा विचार ठाम आहे. मला स्वतःला कोणासोबत शेअर करायचं नाही. लग्न करण्याचा माझा विचार असता,  तर मी सिंगल पेरेंट झालोच नसतो” असं तुषार म्हणतो.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Tusshar Kapoor (@tusshark89)

  मी प्रत्येक दिवशी माझ्या मुलासोबत नवीन काहीतरी शिकत असतो. याशिवाय कुठला पर्याय मला निवडायचा नाही. मी स्वत:ला इतरांसोबत शेअर करू शकत नाही. त्यामुळे भविष्यातही मी तसं करणार नाही. जर शेवट चांगला, तर सगळंच चांगलं. पेरेंटिंग म्हणजे फक्त डायपर बदलणं नाही, तर निस्वार्थ प्रेम, पालनपोषण आणि मुलांना बिनशर्त पाठिंबा देणं असतं” असं तुषार याआधीही म्हणाला होता.

  ४४ वर्षांच्या तुषार कपूर जून २०१६ मध्ये सरोगसीच्या माध्यमातून वडिल झाला. त्याचा मुलगा लक्ष्य आता पाच वर्षांचा होईल. ज्येष्ठ दिग्दर्शक प्रकाश झा यांनी सरोगसीचा पर्याय सुचवल्याचं तुषारने सांगितलं होतं.