बाळाच्या जन्मानंतर तब्बल ४ महिन्यांनी ‘या’ अभिनेत्री शेअर केला बाळाचा पहिला क्यूट फोटो, या हसऱ्या बाळाला पाहून सेलेब्रेटींनाही कमेंट्सचा मोह आवरला नाही!

अमृताने आई झाल्यानंतरचा अनुभव शेअर केला आहे. “वीरच्या जन्मानंतर मी रोज त्याच्याकडे पाहते आणि म्हणते हे रीअल आहे. पहिली गोष्ट जी बाळ आपल्याला शिकवतो ते म्हणजे वेळेचं नियोजन आणि शिस्त. मातृत्व म्हणजे भावनांचं मिश्रण आहे.

    अमृता रावने नोव्हेंबर महिन्यात एका गोंडस मुलाला जन्म दिला. सोशल मीडियावरून अमृता आणि तिचा पती आरजे अनमोल यांनी ही गोड बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली. अमृता आणि अनमोलने आपल्या मुलाचं नाव वीर असं ठेवलं. मुलाच्या जन्मानंतर जवळपास चार महिन्यांनी अमृताच्या मुलाचा फोटो समोर आला आहे. अमृताचा पती आरजे अनमोल याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मुलाचा एक गोड फोटो शेअर केला आहे. हा फोटो चांगलाच व्हायरल होतोय.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by RJ Anmol 🇮🇳 (@rjanmol27)

     काय आहे फोटोत

    अनमोलने शेअर केलेल्या या फोटोत अमृता अनमोलसोबत लहानगा वीर खेळत असल्याचं दिसतंय. मनसोक्त हसणाऱ्या वीरकडे पाहून अमृता आणि अनमोलच्या चेहऱ्यावरही आनंद झळकतोय. “आमचं जग..आमचा आनंद” असं कॅप्शन त्यानं या व्हिडीओला दिलंय. अनेक चाहत्यांनी या फोटोला कमेंट दिल्या आहेत. ‘किती गोड, खुपच सुंदर’ अशा कमेंट चाहत्यांनी या फोटोला दिल्या आहेत.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by RJ Anmol 🇮🇳 (@rjanmol27)

    रोज आपण चिंता, मनोरंजन,थकवा, प्रेम, आनंद अशा वेगवेगळ्या मूडमधून जात असतो.”

     

    View this post on Instagram

     

    A post shared by RJ Anmol 🇮🇳 (@rjanmol27)