वाढदिवसाच्या दिवशी अभिनेत्रीला अटक, फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये मित्रांबरोबर करत होती ड्रग्ज पार्टी!

मुंबईतील सांताक्रुझमधील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ड्रग्ज पार्टी सुरू असल्याची खबर मुंबई पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सोमवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास धाड टाकली.

    ड्रग्ज पार्टी करणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्रीला मुंबईत अटक करण्यात आलीये. सांताक्रुझमधील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये संबंधित अभिनेत्री मित्रांसोबत ड्रग्ज पार्टी करताना रंगेहाथ सापडली. ही अभिनेत्री बॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये लहान- मोठे रोल करायची. पोलिसांनी तिला रंगेहाथ पकडलं.

    मुंबईतील सांताक्रुझमधील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ड्रग्ज पार्टी सुरू असल्याची खबर मुंबई पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सोमवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास धाड टाकली. त्यावेळी अभिनेत्री मित्रांसोबत पार्टी करत होती. त्यानंतर अभिनेत्रीला मित्रासोबत अटक करण्यात आली. हॉटेलच्या एका रुममध्ये ती चरस पित असल्याची माहिती आहे.

    जामिनावर मुक्तता

    तिचा साथीदार आशिक हुसैन यालाही बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. सांताक्रुझ पोलिसांनी एनडीपीएस अॅक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. सोमवारी दोघांना कोर्टात हजर केलं असता जामिनावर मुक्तता करण्यात आली. तिने आतापर्यंत बॉलिवूडसह काही तेलुगू चित्रपटातही काम केलं आहे.