दीपिका पादूकोणलाही कोरोनाची लागण, सोशल मीडियावर शेअर केले हेल्पलाईन नंबर!

दीपिकाची आई आणि बहिणी या तिघांना करोनाची लागण झालीय. १० दिवसांपूर्वीच दीपिकाच्या आई, बहिण आणि वडिलांचा रिपोर्ट करोना पॉझिटिव्ह आला होता.

  दीपिका पोदूकोणच्या संपूर्ण कुटुंबालाच करोनाची लागण झाल्याचं वृत्त नुकतचं समोर आलं होत. त्यानंतर आता दीपिकाची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. वडिलांनंतर दीपिकाला देखील कोरोनाची लागण झाली आहे. दीपिका पादूकोणचे वडील प्रसिद्ध बॅडमिंटनपटू प्रकाश पादूकोण तसचं दीपिकाची आई आणि बहिणी या तिघांना करोनाची लागण झालीय. १० दिवसांपूर्वीच दीपिकाच्या आई, बहिण आणि वडिलांचा रिपोर्ट करोना पॉझिटिव्ह आला होता. या सर्वांना बंगळूरू इथल्या भगवान महावीर जैन रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone)

  अभिनेत्री दीपिका पदूकोणने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने लिहिलं. “जेव्हा मी, माझं कुटूंब आणि आपण सर्वच बरे होण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळी हे लक्षात येतं की आपल्याला मानसिकदृष्ट्याही सक्षम होणं गरजेचं आहे. या पोस्टमध्ये तिनं, ‘यु आर नॉट अलोन’ हा हॅशटॅग वापरला आहे.

  एक आठवड्यातच दीपिकाच्या आई उज्ज्वला पदूकोण आणि बहिण अनिशा पदूकोण यांची प्रकृती सुधारली आहे. परंतू दीपिकाचे वडील प्रकाश पदूकोण यांनी कोरोनावर मात केली नसली तरी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय.